इरा प्ले स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात


इरा प्ले स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात 

 वेब टीम नगर,दि. १४- बोल्हेगाव परिसरातील इरा प्ले  स्कूल चे  ३ रे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडले .  मुलांमधील कलागुणाना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.  या कार्यक्रमाला रिटायर पोस्ट मास्टर विजय  दळवी ,सेल टेक्स ऑफिसर  ज्योती वालझाडे, आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक  वसंत  वाव्हळ आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते.या प्ले  स्कूलमध्ये दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. या  वर्षी तुळशीचे लग्न, सांताक्लॉज, आणि  विद्यार्थ्यांना कराटे शिकवण्याचा उपक्रम घेण्यात आला.  २६ जानेवारीला परेड घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचा वाढदिवस देखील इथे साजरा केला जातात . ड्रॉईंग,दिया मेकिंग, फॅन्सी ड्रेस, स्पोर्ट्स, स्पीच इत्यादी स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आल. यावेळी स्टुडन्ट ऑफ द इयर हा अवॉर्ड आदित्य आणि आराध्या या विद्यार्थ्यांना देण्यात आला. 
यावेळी विजय दळवी म्हणाले,  जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी गुरुजनांचे मार्गदर्शन लागते. बालपणी जे संस्कार होतात तेच आपल्या जीवनाचा पाया बनतात . आणि हे संस्कार साळुंके  दाम्पत्यांनी  मुलांना चांगल्याप्रकारे दिले आहेत.
  सेल्स टॅक्स  ऑफिसर ज्योती वालझडे म्हणाल्या मुलांना  डीजीटल युगामध्ये  जगताना माणूस म्हणून कसे जगायचे याचे भान पालकांनी ठेवले पाहिजे. आपला मुलगा मोबाइलच्या जगात हरवणार नाही याची काळजी पालकांनी घेतलीं पाहिजे असे यावेळी सांगितले.
 वसंत वाव्हळ यांनी  आपला मुलगा शाळेत जातो, कोणाला भेटतो, कसा वागतो,  याचे लक्ष पालकांनी ठेवले पाहिजे. स्नेहसंमेलनाची सुरुवात  गणेश वंदनेने  झाली. या वेळी देशभक्तीवरील गीत, कोळीगीत, लावणी सादर झालीय. तसेच कराटेची   प्रात्यक्षिक सादर झाले.  या कार्यक्रमाला शिक्षकांसोबतच पालकांची देखील लक्षणीय उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments