हिरव्या पाने-फळातील रस साक्षात अमृत- डॉ.राज मर्चंट
आरोग्यवर्धिनी आयोजित स्व.कुंतीलाल गांधी स्मृती कार्यशाळेत उलगडला वनस्पतीचा औषधी साक्षात्कारवेब टीम नगर,दि. १३ - आपली बदलती जीवनशैली सातत्याने घातक बनत असतांना त्यामधुन निर्माण होणारे विकार व त्यावर होणारे औषधोपचार यामुळे अजूनच वेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आपल्या आवतीभवती असणार्या वनस्पती, फळे, फुले यांचे रस सेवन केल्यास आपले विकार लिलया व परिणामकारक बरे होतात. या वनस्पती, हिरवी पाने व त्यांचा रस हे मानवास साक्षात अमृता समान नवजीवन देणारे असल्याचे प्रतिपादन जगप्रसिद्ध लिफ थेरिपिस्ट डॉ.राज मर्चंट यांनी व्यक्त केले.
आरोग्यवर्धिनी योग निसर्गोपचार संस्था, नगर लायनेस क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक 3234 डी-2 अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स महिला शाखा यांच्यावतीने आयोजित स्व.कांतीलाल गांधी स्मृती व्याख्यानप्रसंगी डॉ.मर्चंट यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी सुवालालजी शिंगवी, लायनेसच्या अध्यक्षा सौ.छाया रजपुत, जैन सोशलच्या प्रभा मुथा, प्रभारी सिव्हील सर्जन सौ.धोंडे, आयुषचे वैद्यकिय अधिकारी डॉ.साळूंखे, आरोग्यवर्धीनीच्या अध्यक्षा डॉ.हेमांगिणी पोतनिस, प्राचार्या व समन्वयक डॉ.हेमा सेलोत, सौ.शैलजा घुले उपस्थित होते.
डॉ.मर्चंट यांनी प्रात्यक्षिकांसह कढीपत्ता व श्रावण घेवडा यांच्या सेवनातून काही मिनिटात नियंत्रित होणारी वाढलेली साखर, पानपुट्टीतून किडनी विकारावर नियंत्रण, तुळस व बेलाच्या रसातून कर्करोगावर अतिशय परिणामकारक उपचार, अस्थी व सांधे विकारावर कांदारस अशा अनेक गोष्टींवर प्रात्यक्षिक करुन दाखविले.
मान्यवरांचे स्वागत डॉ.हेमांगिनी पोतणिस यांनी केले, प्रास्तविकात प्राचार्या डॉ.हेमा सेलोत यांनी ‘आरोग्यवर्धिनी अनेक वर्षापासून निसर्गोपचाराच्या माध्यमातून नगरकरांचे सुदृढ आयुष्यासाठी चळवळ उभारत आहे. नवयुवतीमध्ये ही जागृती मोठ्या प्रमाणात होत असून, टिळक विद्यापीठ व आरोग्यवर्धिनीच्या अभ्यासक्रमातून हजारो युवतींनी समाजात निसर्गोपचार चळवळ वृद्धींगत केली आहे. लवकरच ‘अॅक्युप्रेशर ’ चे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. यावेळी नॅचरल ब्युटीशियन शिबीरात यशस्वी शिबीरार्थींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी ऋतुजा बिडवे, रिद्धी चंदे, पल्लवी शिंगी यांचे सहकार्य लाभले. आभार विलास छिंदम यांनी मानले.
0 Comments