अर्बन बँक कॉलनीत विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा वर्धापन दिन साजरा
वेब टीम नगर,दि. १२ - नगर-औरंगाबाद रोडवरील अर्बन बँक कॉलनीत आदिनाथ जोशी यांच्या निवासस्थानी प्रती पंढरपुर असलेल्या विठ्ठल-रुख्मिणी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणात झाला. पहाटे मूर्तीला रुद्राभिषेक, भक्तीगीतांचा कार्यक्रम महाआरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.अभिजित जोशी-प्रज्ञा जोशी या दाम्पत्यांच्या हस्ते मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. महेश गोंडळकर या तरुणाने विठ्ठलाच्या भक्तीमय गीतांनी आपल्या सुमधूर आवाजाने भाविकांना मंत्रमुग्ध केले.
सायंकाळी भार्गव जोशी, माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या महाआरतीनंतर आदिनाथ जोशी यांनी भाविकांना मंदिर स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. ३० वर्षांपूर्वी कॉलनीतील अर्बन बँकेचे कर्मचारी येथे रहात होते. सायंकाळी त्या वेळेस जवळ कोठेच देव-दर्शनासाठी मंदिर नव्हते कॉलनीतच विठ्ठल-रुख्मिणीचे मंदिर बांधून भाविकांना दर्शनाची सोय होईल. या उद्देशानेच मंदिर बांधले. यामुळे रोज त्या निमित्ताने भजन, किर्तन, हरिपाठ होऊ लागले. आषाढी एकादशीला उपनगरातून भाविक दर्शनाला येत. कॉलनीतील सर्व सदस्य एकत्र आले ही परंपरा आज देखील असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.
महाआरती झाल्यावर महाप्रसादाचा लाभ आ.संग्राम जगताप, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, धनंजय गाडे, अजिंक्य बोरकर, संगीता खरमाळे, मनपाचे अभियंता, पदाधिकारी व परिसरातील भाविकांनी घेतला. सर्वांचे अभिजित जोशी यांनी आभार मानले.
0 Comments