राष्ट्र निर्माण व सेवा प्रकल्पांचे दर्शन घडविणारा सेवा कुंभ

                                             

 

राष्ट्र निर्माण व सेवा प्रकल्पांचे दर्शन घडविणारा सेवा कुंभ

माजी न्याय मूर्ती विष्णूजी कोकजे - विश्व हिंदू परिषदेच्या सेवा कुंभात सामाजिक सेवाभावी संस्थाचा मेळावा                               
वेब टीम नगर,दि. १२ -सेवा परमोधर्म आहे.विश्व हिंदू परिषदे तर्फे देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य सुरु आहे.दर ५ वर्षांनी प्रांतात सेवा कुंभ घेतला जातो.वसतिगृहातून सुसंस्कारित नागरिक घडविण्याचे महत्तम कार्य अनेक वर्षांपासून होत आहे.वसतिगृहांना २५ वर्षा पेक्षा अधिक काळ झाल्याने सेवा कार्याची प्रगती झाली आहे.या सेवाकुंभामुळे विश्वहिंदू परिषदेची सेवाभावी संस्था म्हणून ओळख झाली आहे.परंतु हि सेवा कार्य प्रसिद्धीपासून परामुख आहेत.सेवा कुंभातून सेवा कार्याचा प्रसार व एकत्रीकरण व्हावे.सेवा कार्य करणारे कार्यकर्ते जोडले जावेत.तसेच सेवाभावी संस्थांना योग्य मार्गदर्शन मिळावे.हा हेतू सेवा कुंभातून साध्य होतआहे.विहिप द्वारे वाडी वस्तीवर राहणारे आदिवासी अभावग्रस्त बांधवांसाठी एकल विद्यालये.रुग्ण सेवा,आरोग्य केंद्र,बालवाडी,वसतिगृहे,शाळाआदी सुविधा विश्व हिंदुपरिषदे तर्फे देण्यात येत आहे.लाखो वंचीत बांधवांच्या जीवनात आशेचा किरण प्रजवलित करून स्वाभिमानी समाज निर्माणाचे कार्य विहिप करत आहे.विद्यार्थी शिक्षन व संस्काराचे धडे घेत आहेत.हेच विद्यार्थी देशाचे आदर्श नागरिक व व्यक्ती निर्माणाचे कार्य होत आहे.पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील नगर येथील सेवा कुंभ राष्ट्र निर्माण व सेवा प्रकल्पांचे दर्शन घडविणारा आहे असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्याय मूर्ती विष्णूजी कोकजे यांनी केले आहे.                                        केडगाव येथील डॉ.हेडगेवार संकुलात विश्व हिंदु परिषदेचा पश्चिम महाराष्ट्राचा प्रांत सेवा कुंभ उत्साहात पार पडला.समारोपप्रसंगी मार्गदर्शन करताना विश्व हिंदू परिषदेचे आंतर राष्ट्रीय अध्यक्ष माजी न्याय मूर्ती विष्णूजी कोकजे बोलत होते.या प्रसंगी विश्व हिंदुपरिषदेचे केंद्रीय मंत्री सह सेवा प्रमुख प्रा.मधुकरजी दीक्षित,जैन मुनी पदम ऋषीजी म.सा.अलोक ऋषीजी म.सा.प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत,ह भ प अर्जुन महाराज जाधव,प्रांत संघचालक नानासाहेब जाधव,गिरीवरधारी प्रभू (इस्कॉन मंदिर),प्रांत मंत्री विजय देशपांडे,आंतरराष्ट्रीय खेळाडू अंजलीताई वल्लाकट्टी ,सिने कलावन्त अनुजा कांबळे,प्रांत उपाध्यक्ष बाबूजी नाटेकर,क्षेत्र गोरक्षण प्रमुख भाऊराव कुदळे,प्रांत सेवा प्रमुख दादा ढवाण,प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी,संजय मुरदाळॆ,कोषाध्यक्ष महेंद्र देवी,माजी खासदार दिलीप गांधी महापौर बाबासाहेब वाकळॆ,कमलेशजी पांचाळ,जिल्हा संघचालक डॉ रवींद्र साताळकर,डॉ दिलीप धनेश्वर,शहर कार्यवाह हिराकांत रामदासी,वाल्मिक कुलकर्णी,नाना गोविलकर,संजय कुलकर्णी,नाशिक सेवा विभागाचे प्रमुख महादेव सोनवणे,प्रांत सेवा सहप्रमुख डॉ.प्रदीप उगले,जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.                       केंद्रीयमंत्री सह सेवा प्रमुख प्रा.मधुकरजी दीक्षित म्हणाले कि,देशभरात विहिप द्वारे १,८६,००० सेवा कार्य सुरु आहेत.स्वामी विवेकानंद यांनी धर्म परिषदेत माता आणि भगिनी असा उल्लेख केला आहे.तसेच संत ज्ञानेश्वर महाराज याना सर्व माउली म्हणून संबोधतात.हिंदू संस्कृती टिकविण्यासाठी मातृत्वाची भावना निर्माण होणे आवश्यक आहे.सेवा सुरक्षा व संस्कार या त्रीसुत्रीप्रमाणे विहीप चे कार्य होत आहे.भारत जगद्गुरू होण्यासाठी सेवा करायची वाढ होणे आवश्यक आहे.                                                                                                                       हभप अर्जुन जाधव महाराज म्हणाले कि,सेवा कार्य हे ईश्वरी कार्य असल्याने विश्व हिंदुपरिषदेचे कार्याची महती सर्वत्र समाजात पोहोचली आहे.सेवा कार्यात विश्व हिंदुपरिषेदेचे योगदान अभूतपूर्व आहे.दीर्घकाळ सेवा कार्य करणारी हि जगातील एकमेव संघटना आहे.                                                                                                                                                                                                                     
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतमाता व श्रीरामाचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदु परिषदेचे सर्व पदाधिकारी,विद्यार्थी,स्वयंसेवक,नागरिक ,विवि सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रांत सेवा प्रमुख दादा ढवाण यांनी प्रास्तविक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बजरंगदलप्रमुख गौतम कराळे,प्रांत मीडिया प्रमुख अमोल भांबरकर,शहरमंत्री अनिल देवराव,शहर सहमंत्री राजेंद्र चुंबळकर,भारत थोरात,सागर रोहोकले आदींनी परिश्रम घेतले.                                                                     
सूत्र संचालन प्रांत सेवा सह प्रमुख डॉ प्रदीप उगले तर आभार जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे यांनी मानले. 

Post a Comment

0 Comments