सामान्यांना न्याय मिळण्याच्या आशा आता पल्लवीत झाल्या
पवार-भिंगार शाखा उद्घाटनात ना.थोरात यांचा वाढदिवसवेब टीम नगर,दि. १० - सामान्यांना न्याय मिळण्याच्या आशा आता पल्लवित झाल्या असून, तळागाळातील कार्यकर्त्यांचा प्रवाह जपण्याची भुमिका ना.बाळासाहेब थोरात यांची असल्याने ते कॉग्रेसला पूर्ववैभव प्राप्त करुन देतील, असा विश्वास अहमदनगर ग्रामीण जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष कचरु पाटील पवार यांनी व्यक्त केला. ‘गाव तेथे शाखा’ या काँग्रेस अभियानांतर्गत भिंगार शहर काँग्रेस कार्यालयात शाखा उद्घाटन आणि नव्या फलकाचे अनावरण सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष कचरु पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.आर.आर.पिल्ले होते.
महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा होत आहे. यानिमित्त शाखा उद्घाटनाचा हा कार्यक्रम स्त्युत्य उपक्रम असून, भिंगार काँग्रेस कार्यालयाचे नुतनीकरण करण्याचा प्रश्न ना.थोरात यांच्यापर्यंत नेऊ व तो सोडवू, असे आश्वासन कचरु पाटील यांनी यावेळी दिली. अध्यक्षीय भाषणात अॅड.पिल्ले यांनी काँग्रेस कार्यालयाची ही जुनी ऐतिहासिक वास्तू जपण्याची आणि नव्या पिढीकडे ती सोपविण्याची परंपरा सुरु ठेवतांना कार्यालयाचे नुतनीकरण करणे गरजेचे असल्याचे नमूद करुन भिंगार ऐतिहासिक आणि काँग्रेस चळवळीचे शहर असून, ही भुमी स्वातंत्र्य सैनिकांचीही आहे. आजही येथे प्रामाणिक, निष्ठेने कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेऊन या शहराचा विकास व्हावा, अशी अपेक्षा अॅड.पिल्ले यांनी व्यक्त केली.
सेवा दलाच्या जिल्हाध्यक्षपदी कचरु पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागतपर भाषणात प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर यांनी भिंगार कमिटी कार्याचा आढावा घेतला. पदाधिकारी सर्वश्री संतोष धीवर, रेवणनाथ देशमुख,सुभाष त्रिमुखे, संजय झोडगे, निजाम पठाण, महिलाध्यक्षा सौ.मार्गरेट जाधव आदि उपस्थित होते. शेवटी प्रवक्त रिजवान शेख यांनी आभार मानले
0 Comments