जैवतंत्रज्ञान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन जैवतंत्रज्ञान या  विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

वेब टीम नगर,दि. ९ : न्यू आर्ट्स्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथे ११ व १२ फेब्रुवारी २०२० रोजी जैवतंत्रज्ञान व जीवशास्र या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांनी दिली.
या परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरशाखा विभागाचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते तर अहमदनगर जिल्हा मराठा  विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या परिषदेसाठी प्रमुख पाहूणे म्हणून इस्टर्न युनिव्हर्सिटी श्रीलंका येथील डॉ. चंद्रकांता महेंद्रनाथन् व त्रिभुवन विद्यापीठ नेपाळचे डॉ. मदन कोईराला उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेमध्ये पर्यावरणात होणारे बदल व प्रदुषणामुळे मानवी आयुष्यावर होणारे गंभीर परिणाम यावर उपाय शोधण्यासाठी विचारमंथन व्हावे व जैवतंत्रज्ञान व जीवशास्र या विषयांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जैवतंत्रज्ञान व जीवशास्र या विषयांचे अभ्यास २०४ शोधनिबंध सादर करणार आहेत. या परिषदेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे संचालक डॉ. ए. के. पंदरकर व महाविद्यालयाचे उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
Post a Comment

0 Comments