उद्धव ठाकरेंचे विधान परिषदेस प्राधान्य
वेब टीम नगर,दी.३-राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका तातडीने येऊ घातलया आहेत . दोन ते तीन महिन्यात विधान परिषद लढवण्याचा विचार करावा लागेल असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सांगितलंराऊत यांनी विधानसभा निवडणूक लढवणार की विधान परिषद निवडणूक लढवणार असा प्रश्न विचारला त्यावेळी बोलत होते .काही विधानसभेत पुढच्या दाराने त्यात काही मागच्या दाराने मात्र मी छपरातून पडलो असल्याने , कोणालाही न दुखवता विधान परिषदेची निवडणूक लढवायला आवडेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले .
हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर बोलताना मी काय धर्म बदलला असा सवाल करून त्यांनी,भाजपचा सर्वव्यापी असल्याचा दावा भाजपने करू नये आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणी राहणार असाही टोला त्यांनी लगावला .
संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी बेळगाव कारवार महाराष्ट्राचे आहे, मात्र दुर्दैवाने केंद्र सरकार काही वर्षांपासून कर्नाटकची बाजू लावून धरत असल्याचं त्यांनी सांगितलं .
0 Comments