ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबीरास प्रारंभ


    वेब टीम  नगर,दि . १ -    नवनागापूर येथे आंधळे-चौरेनगर मध्ये जगात ४० देशात काम करणार्‍या लॅण्ड मार्क एज्युकेशन संस्थेतर्फे नवनागापूर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन डॉ.दिलीप दाणे यांच्या माध्यमातून होत आहे. या शिबीराला परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांच्या संपूर्ण शारीरिक तपासणी यावेळी करण्यात आली.
     याप्रसंगी डॉ.दिलीप दाणे म्हणाले, वाढत्या वयोमानाप्रमाणे प्रत्येकाला विविध आजारांना सामोरे जावे लागत असते. आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम, चालणे, प्राणायाम या गोष्टी आवश्यक आहेत. त्याच प्रमाणे आपल्या खाणपानच्या सवयी वयोमानानुसार बदलल्या पाहिजे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी केल्यास उदभवणार्‍या आजारावर उपचार करणे सोपे जाते. संयोजकांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणीचा उपक्रम कौतुकास्पद असाच आहे. अशा उपक्रम ठिकठिकाणी व वेळोवेळी राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
      सदरील आरोग्य शिबीर ज्येष्ठ नागरिकांकरीता  दर रविवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत गणेश मंदिर, आंधळे-चौरेनगर, नवनागापूर येथे आयोजित करण्यात येणार आहेत, त्यांचा ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले. अधिक माहितीसाठी 9822854851 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments