पाणी वाचविण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा

मनपाच्या रक्तपेढीची दुरावस्था  पाहून भाजपचे शिष्टमंडळ संतापले 

वसंत लोढा-आरोग्य अधिकारी डॉ.बोरगे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करणार 
     वेब टीम नगर,दि.१ - सर्वसामान्य नागरिकांना, रुग्णांना अत्यल्प दरात रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने नगर पालिकेने सुरु केलेल्या रक्तपेढीचे उदघा  टन १९८६  साली भाजपाचे तात्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे या रक्तपेढीप्रती सर्व भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात आपुलकी आहे. मात्र आज या रक्तपेढीची झालेली दुरावस्था पाहून संताप होत आहे. सर्वसामान्य रुग्णांना आधार असलेल्या या रक्तपेढीत आल्यानंतर येथील परिस्थिती मोठी विचित्र झाली आहे. डॉ.शंकर शेडाळे हे केवळ रजिस्टरवर सह्या करण्यापुरतेच रक्तपेढीप्रमुख राहिले आहेत. डॉक्टरांच्या पूर्ण दुर्लक्षामुळे, कर्मचार्‍यांच्या अभावी, येथे लाखो रुपयांच्या नव्या मशिनरी धूळखात पडल्या आहेत. जर एखादा रक्त देण्यासाठी आलातर त्याचे रक्त घेण्यासाठी येथे साहित्य नाही, टेक्निशियन नाही, क्लार्क नाही, अशा असुविधा असल्याने ही रक्तपेढी केवळ नावापुरतीच राहीली नाही. शहरातील खाजगी रक्तपेढ्यांमध्ये १५०० ते २०००  रुपयांपर्यंत रुग्णांना रक्त मिळते, मात्र मनाच्या या रक्तपेढीमधून केवळ ५०० रुपयांत सर्वसामान्य रुग्णांना रक्त मिळत असे. आज मात्र या रक्तपेढीत रक्ताची एकही पिशवी नसल्याची ही बाब अत्यंत संतापजन क आहे.  येथे असलेल्या केवळ एक सिस्टर व कर्मचारी यांनी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार करुन रक्तपेढीसाठी कर्मचारी व साहित्यांची मागणी केली; मात्र डॉ.बोरगे यांनी या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सर्वसामान्य नागरिकांना आधार असलेल्या या रक्तपेढीच्या दुरावस्थेसाठी डॉ.अनिल बोरगे हेच जबाबदार आहेत, त्यामुळे आम्ही सर्व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तातडीने महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन ही रक्तपेढी पुन्हा सुरु करण्यासाठी उपाययोजना राबविण्याबरोबरच आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना निलंबित करण्याची मागणी करणार आहोत, असा इशारा ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला.
     महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय येथे असलेल्या रक्तपेढीची दुरावस्था झाली आहे. तेथे रक्ताचा एकही थेंंब उपलब्ध नाही, हे कळल्यावर  वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने रक्तपेढीला अचानक भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी तेथे केवळ दोनच कंत्राटी कर्मचारी होते. एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी रक्तपेढीत नव्हते. रक्तपेढीचे प्रमुख डॉ.शंकर शेडाळे यांना वसंत लोढा यांनी भ्रमणदूरध्वनीवरुन संपर्क साधला असता, त्यांनी आजारी असल्याने केवळ सही करुन घरी आलो आहे, असे सांगून उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेले वसंत लोढा यांनी डॉ.शेडाळे यांना चांगलेच धारेवर धरले.
     यावेळी भाजपाचे अनिल गट्टाणी, महावीर कांकरिया, केडगांव मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, हरिभाऊ डोळसे, महेश नामदे, तुषार पोटे, सुहास पाथरकर, विकी सुपेकर आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments