चंकी पांडेचा पहिला मराठी चित्रपट 'विकून टाक'
व्हॅलेंटाईन दिनी प्रेक्षकाच्या भेटीला
वेब टीम पुणे ,दि. १-विवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित 'विकून टाक' हा मराठी चित्रपट व्हॅलेंटाईन दिनी१४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार असल्याची माहिती याचित्रपटाचे दिग्दर्शक समीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या चित्रपटाबद्दल आधील माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस अभिनेते जयवंत वाडकर, शिवराज वायचळ, राधा सागर, रोहित माने आदी कलावंत होते.
हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीचा अभिनेते चंकी पांडे हे या चित्रपटात दुबईतील एका श्रीमंत अरबाची भूमिका साकारत आहेत. शिवराज वायचळ, राधा सागर, रोहित माने, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, ऋषिकेश जोशी, वर्षा तांदळे, जयवंत वाडकर आणि दिग्दर्शक समीर पाटील यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.
या चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चित्रपटांमधून विनोदी अंगाने सामाजिक संदेश देणारे दिग्दर्शक समीर पाटील 'विकून टाक' सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'पोश्टर बॉईज', 'पोश्टर गर्ल' सारखे सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर समीर पाटील 'विकून टाक' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टिझर बघून थोडीफार कल्पना आलीच असेल, की या चित्रपटातही काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार. 'विकून टाक' या सिनेमाचा ट्रेलर आणि चित्रपटातील 'दादाचं लगीन', 'डोळ्यामंदी तुझा चांदवा' या दोन गाण्यांना रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण भागात घडणाऱ्या या कथेतल्या 'मुकुंद तोरांबे' या गावातील हॅण्डसम तरुणाभोवती फिरते. सर्वसामान्य आयुष्य जगत असतानाच त्याच्या आयुष्यात काही घटना घडतात आणि, त्यातच अधिक भर म्हणून त्याच्या आयुष्यात एक अनपेक्षित पाहुणा येतो. हा दुबईहून आलेला पाहुणा मुकुंदला का शोधतोय? मुकुंद आणि त्या अरब शेखचे काय कनेक्शन? आणि या सगळयात गावकऱ्यांच्या मनात उपस्थित झालेल्या शंका, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चित्रपट आल्यावरच कळतील.
मुळात एखादा सामाजिक विषय हलक्याफुलक्या, विनोदी पद्धतीने मांडला तर तो प्रेक्षकांना अधिक भावतो, असे मानणाऱ्या समीर पाटील यांनी 'विकून टाक'द्वारेही काहीतरी प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्रपटातील भूमिकेबाबत अभिनेते चंकी पांडे म्हणाले की, यापूर्वी मला अनेक मराठी चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या. परंतु त्यातील भूमिका मला आवडल्या नव्हत्या. मात्र समीर पाटील यांनी जेव्हा या चित्रपटाची कथा मला सांगितली. तेव्हा मी त्या कथेच्या प्रेमात पडलो. आणि मी हा चित्रपट करायला तयार झालो. हा चित्रपट कुठल्याही भाषेत करण्यासाठी मी तयार झालो असतो एवढी सशक्त कथा ही आहे. मराठीभाषेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा विनोद निर्मिती करता येते. अलीकडच्या काळात मराठीतही खूप आशयघन चित्रपट निर्मिती होत आहेत. विविध विषय हाताळले जाताय ही अत्यंत आनंदाची बाब आहे. या चित्रपटात मी एका स्टायलिश अरबाची भूमिका साकारली आहे. हा अरब गावात उंट घेऊन येतो आणि संपूर्ण गावलाच दुबई करून टाकतो अशी ही गंमतीशीर भूमिका आहे.
या चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे यांची असून चारुदत्त भागवत आणि समीर पाटील यांची पटकथा आहे. गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या अमित राज यांनी संगीत साज चढविला आहे. चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन वृषाली चव्हाण यांनी केले असून छायाचित्र सुहास गुजराथी यांचे असून कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे.
0 Comments