श्री जगन्नाथ रथयात्रेचे विश्वहिंदु परिषदेतर्फे स्वागतश्री जगन्नाथ रथयात्रेचे विश्वहिंदु परिषदेतर्फे  स्वागत                                                       

  वेब टीम नगर,दि.२  -अंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ( इस्कॉन )आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाची मिरवणूक नगर शहरातील प्रमुखमार्ग पोलीस लॉन्स,सिद्धीबाग,दिल्लीगेट,चौपाटी कारंजा,चितळे रस्ता,नेताजी सुभाष चौक,नवीपेठ,भिंगारवाला चौक,एम.जी.रोड,सर्जेपुरा येथून रेसिडेन्सील हायस्कुल पोलीस लॉन्स येथे समारोप करण्यातआला.या मिरवणुकीत '' हरे कृष्ण हरे राम ''या जयघोषात सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले.या मिरवणुकीचे स्वागत दिल्लीगेट येथे विश्वहिंदु परिषदेतर्फे करण्यात.आले.विश्वहिंदु परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे,डॉ.चंद्रकांत केवळ,बाली जोशी,बन्शी महाराज मिठाईवाले,प्रखण्डमंत्री राजेंद्र चुंबळकर,अँड कानडे आदी उपस्थित होते.या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येनी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments