सोमवार ठरला अपघातवारसोमवार ठरला अपघातवार

 तीन वेगवेगळ्या अपघातात सोळा जणांचा मृत्यू 

वेब टीम नगर ,दि . ३-जळगावात सोमवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून यावल तालुक्यातील हिंगोणे गावातील फैजपूर रस्त्यावर क्रूझर डंपर यांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत या दहा जणांचा मृत्यू झाला .  तर सात जण गंभीर जखमी झालेले आहेत .मध्यरात्रीच्या सुमारास राखेने भरलेल्या डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चौधरी आणि महाजन परिवारातीलसदस्यांवर  काळाने घाला घातला .  हे सर्वजन लग्नाहून परतत होते या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत
तर सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावातील झरे पारेवाडी या रस्त्यावर वॅगन आर गाडी विहिरीत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे .
आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी चाललेल्या या पाचही जणांवर काळाने घाला घातला आहे. पारेवाडी कडून गाडी जात असताना चालकाचे नियंत्रण  सुटल्याने गाडी विहिरीत कोसळली आणि यात पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला मात्र गाडीची काच फोडून बाहेर पडल्याने एकजण बचावला आहे .
तर तिसऱ्या अपघातात पुण्यात टिळक नगर जवळ एका दुचाकीस्वाराची रिक्षाला धडक बसून तो फरपटत गेल्याने सिटी बस खाली येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे .

Post a Comment

0 Comments