तिळगुळ वाटपातून सर्वधर्म समभावाची भावना निर्माण होते
सुभाष पवार - महानगरपालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचा तिळगुळ वाटप समारंभवेब टीम नगर,दि.२- तिळगुळ वाटप कार्यक्रमातून अतूट सेहबंध जोडले जात आहेत.मकरसंक्रांत हा सण सर्व समाजातील लोकांसाठी आपुलकी व गोडवा निर्माण करणारा आहे.एकमेकांविषयीची कटुता सोडून देऊन प्रत्येकानी एकमेकांशी चांगले संबध प्रस्थापित केल्यास तिळगुळ वाटप कार्यक्रमाचा हेतू साध्य होईल.सेवानिवृत्त शिक्षक नेहमीच समाजाला दिशादर्शक असे कार्यक्रम घेत असतात.तिळगुळ वाटप कार्यक्रमातून सर्वधर्म समभावाची भावना निर्माण झाली आहे.असे प्रतिपादन मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार यांनी केले.
सिद्धिबागे जवळील संबोधी विद्यालयात अ.नगर महानगरपालिका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचा तिळगुळ वाटप समारंभ उत्साहात साजरा करण्यातआला.या प्रसंगी मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार बोलत होते.याप्रसंगी महाराष्ट्र टंकलेखन व टायपिंग असोशिएशनचे अध्यक्ष प्रकाश कराळे,पर्यवेक्षक जुबेर पठाण,जेष्ठ सल्लगार औटी गुरुजी,सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष खाजलाल नवाज खान,सरचिटणीस सुभाष कुबडे,र.बा.म्हसणे,बबनराव सोनवणे,वसंत कऱ्हाडकर,सामाजिक कार्यकर्ते कुतुबुद्दीन शेख,कुडूस , स.रा.गोरे,शबानाअब्बास,सौ.मंगला नाईक, मथुराबाई आगवणे,सुभद्रा मोरे,चंद्रभागा वाडेकर आदींसह सर्व पदाधिकारी व सेवानिवृत्त शिक्षक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
औटी गुरुजी म्हणाले कि,स्नेह व आपुलकी सर्वांमध्ये रहावी व ऋणानुबंध टिकावे यासाठी तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले जातआहे.
प्रकाश कराळे म्हणाले कि,सेवानिवृत्त शिक्षक हे सर्वांचे मार्गदर्शक आहेत.तिळगुळ वाटप कार्यक्रम हा आनंदी सोहळाआहे.सर्वाना नवीन वर्ष व संक्रातीच्या शुभेच्छा.
सामाजिक कार्यकर्ते कुतुबुद्दीन शेख म्हणाले कि,या तिळगुळ वाटप कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते.भारतीय सण उत्सव व परंपरेतून एकमेकांशी चांगले बोलावे व चांगले वागावे हा संदेश दिला जातो.या तिळगुळ वाटप कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी जपली जाते. बबनराव सोनवणे यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन स.रा.गोरे यांनी केले तर आभार सुभाष कुबडे यांनी मानले.
0 Comments