इन्फोसिसद्वारे कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन

रायसोनी महाविद्यालयात इन्फोसिसद्वारे कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन

वेब टीम नगर,दि. १- गतवर्षीप्रमाणे यावर्षीही चास,  येथील जी. एच रायसोनी महाविद्यालयात दि. ३ व ४ फेब्रुवारी  २०२० रोजी इंजिनीरिंगच्या सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी इन्फोसिसद्वारे कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले आहे. हा ड्राइव्ह नगर जिल्ह्यातील इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला आहे. यासाठी रायसोनीसह नगर शहर, कोपरगाव, संगमनेर, लोणी येथील विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केलेली आहे व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र मिळालेले आहेत.या ड्राइव्हसाठी इन्फोसिसकंपनीने सर्वप्रथम रायसोनी कॉलेजला प्राधान्य दिले याबद्दल संस्थेकडून कंपनीचे आभार मानण्यात आले. या ड्राइव्हच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन व ट्रैनिंग आणि प्लेसमेंट सेल परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments