मराठी भाषेचा स्पर्श मायेचा : चंद्रकांत पालवे


मराठी भाषेचा स्पर्श मायेचा : चंद्रकांत पालवे


वेब टीम नगर,दि. २७ - मराठी भाषा म्हणजे आई असल्याने तिचा स्पर्ध मायेचाच असतो. तिचे संवर्धन हे आजच्या तरुण विद्यार्थ्यांचे व्रत असावे, असे प्रतिपादन कवी चंद्रकांत पालवे यांनी केले.
     अहमदनगर महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ निमित्ताने ते बोलत होते. याप्रसंगी विभागप्रमुख डॉ.चं.वि.जोशी यांनी मातृभाषेचा गौरव करतांनाच पालवे यांचा परिचय करुन दिला.
     चंद्रकांत पालवे पुढे म्हणाले, मातृभाषेला आजही अभिजित भाषेचा दर्जा मिळाला नसल्याची खंत व्यक्त आहे. कवी कुसूमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेत कुसूमाग्रजांशी झालेल्या भेटीची आठवणही सांगितली. कुसुमाग्रजांनी सर्व साहित्य प्रकारात लेखन केले. मराठीतून केलेले त्यांचे लेखन अक्षर वाङमय ठरले असल्याचे सांगून कुसुमाग्रजांच्या कविता सादर केल्या.
     या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी, विद्यार्थीनी यांनीही मराठी कविता सादर केल्या. मराठीतील साहित्य सर्वांनी वाचावे, मराठीतून लिहावे, हा संदेश देत मराठी भाषा दिन साजरा  झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रा.पी.वाय.सिनारे यांनी केले. प्रा.सूर्यवंशी यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments