दहावी हा जीवनातील महत्वपूर्ण टप्पा

     
                                 

दहावी हा जीवनातील महत्वपूर्ण टप्पा 

प्रा.शिरीष मोडक - दादाचौधरी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ 
 वेब टीम नगर,दि. २७ -दहावी हा जीवनातील महत्वपूर्ण टप्पा आहे.शाळेतून बाहेर पडल्यावर आचरण असे ठेवा कि शाळेला तुमचा अभिमान वाटेल.डॉक्टर,इंजिनिअर,ॲडव्होकेट,शिक्षक,आयटी अश्या अनेक क्षेत्रात भरारी घेण्यासाठी चांगले कार्य करा.परीक्षेत उत्तम गुण मिळवा.दहावीनंतर हिंद सेवा मंडळाच्या सारडा महाविद्यालयात दादा चौधरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने ११ वी इयत्तेत प्रवेश दिला जाईल.डॉ.दीपा मोहोळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत तपासणी केली.डॉ.मोहोळे यांचे नेत्रसेवेचे हे कार्य कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक यांनी केले.                                                                                                               
हिंदसेवा मंडळाच्या दादाचौधरी विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक बोलत होते.याप्रसंगी चैतन्य क्लिनिकच्या संचालिका प्रसिद्ध नेत्रतज्ञ  डॉ.दीपा मोहोळे यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांची मोफत नेत्र तपासणी केली.विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून शाळेला घड्याळ व कॅलेंडर भेट दिले.याप्रसंगी दादा चौधरी विद्यालयाचे चेअरमन ॲड सुधीर झरकर,शालेय समिती सदस्य अर्चना राऊत ,सेवक प्रतिनिधी विठ्ठल ढगे, मुख्याध्यापक संजय मुदगल,दीपक आरडे, अजय महाजन,नितीन केणे, विजय राहिंज,दीपक शिंदे,दिनेश मुळे,गोवर्धन पांडुळे,सुनंदा देशमुख,वर्षा गुंडू,ज्योती बोलके, देवकर आदी उपस्थित होते.                                                                       
 डॉ.दीपा मोहोळे म्हणाल्या की,दहावीच्या विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून शाळेचे व संस्थेचे नाव उज्वल करावे.तसेच चाळीसगाव येथील बालपणीच्या आठवणी सांगताना शेतकरी कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या आजोबांनी १६ वाघांची शिकार केली होती.व पाठयपुस्तकातील सोनाली सिहिणींच्या धड्यातील दीपाली छोटी मुलगी त्या आहेत हि आठवण करून दिली.                                                                                                                                                               चेअरमन ॲड सुधीर झरकर म्हणाले की,दहावीनंतर विद्यार्थ्यांना शिक्षणाची अनेक दालने उघडी आहेत.तुमच्या खांद्यावर जबाबदारी समर्थपणे पेलण्यासाठी शाळेने तुम्हाला घडविले आहे.आता स्पर्धेच्या युगात अनेक नवीन आव्हाने आहेत.त्यांना धाडसाने सामोरे जावे.दहावीच्या विद्यार्थ्यांकडून आई,वडील, समाज,पालक व शिक्षकांना अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मेहनत करा व यश मिळवावे.  कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भाषणे केली.मुख्याध्यापक संजय मुदगल यांनी प्रास्तविक केले.सूत्र संचालन दीपक आरडे यांनी केले तर आभार दीपक शिंदे यांनी मानले.   

Post a Comment

0 Comments