अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार


अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार 

राज्य सचिव सुनिल गाडगे - शाळा बंद करण्याचा  शासन निर्णय मागे घ्या

वेब टीम नगर,दि. २६ -  गोरगरीब बहुजन मुलांच्या घरापासून शिक्षण दूर जाणार आहे. सरकार कोणतेही असो. मुद्दा शाळाबंदीपाशी येऊन का थांबतो? बाकी पर्यायांचा विचार का नाही होत? भटके, आदिवासी, दलित अशा बहुजन समाजातल्या गरीब मुलांना शिक्षणाची दारे बंद करणार्‍या शाळाबंदीला अहमदनगर जिल्हा शिक्षक भारती संघटनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा राज्य सचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
     म्हणजेच जिथे शाळा नाहीत त्या दुर्गम भागातील बालकांना नजीकच्या शाळेत नेण्यासाठी शासन वाहतूक व्यवस्था करते आहे. मागील सरकारच्या काळात  ज्या शाळा बंद करण्यात आल्या तीच बहुतांशी ही वसतिस्थाने असून काहींची भर घालण्यात आली आहे असे दिसून येते. चालू असलेल्या शाळा बंद करायच्या आणि दुर्गम भागात जिथे वाहन जाऊ शकत नाही तिथे वाहन व्यवस्था केल्याचा दावा करायचा याचा अर्थ स्पष्ट आहे की९१७ शाळा बंद होणार आहेत. म्हणजेच ४८७५ विद्यार्थी त्यांच्या गाव / वाडी / वस्तीतील शाळेपासून वंचित राहणार आहेत.  मागच्या सरकारचे गोरगरीब विरोधी शैक्षणिक धोरण आपल्या सरकारने पुढे चालू ठेवू नये. आहे त्या शाळा बंद करू नये. त्यासाठी दि. २० फेब्रुवारी२०२०शासन निर्णय मागे घेऊन उपकृत करावे, असे शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील  यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे शाळा बंद करु नयेत असे आवाहन केले आहे.

    ९१७  शाळा व त्या शाळांमध्ये प्राथमिकचे शिक्षण घेणारे विद्यार्थी ४८७५ आहेत अशा शाळा बंद करण्यात येवू नये, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असे आवाहन   जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, प्राथमिक राज्य उपाध्यक्ष दिनेश खोसे, माध्यमिकचे सचिव  विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, श्रीकांत गाडगे, उपाध्यक्ष मोहंमद समी शेख, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक कैलास रहाणे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, सचिव महेश पाडेकर, किशोर डोंगरे, संपत वाळुंज, नवनाथ घोरपडे, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, रोहिदास चव्हाण, किसन सोनवणे, इकबाल सय्यद, राजेंद्र जाधव, संजय पवार, प्रमोद दिवेकर, सुदर्शन ढगे, गंगाराम साबळे, संभाजी पवार, संतोष मगर, अनिल लोहकरे, रामनाथ थोरात, बाळासाहेब थोरात, संतोष देखमुख, योगेश हराळे, काशिनाथ मते, नारायण झेंडे, राजाराम हिरवे, महादेव कोठारे, घोरपडे , सचिन लगड,  महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, जिल्हा कार्याध्यक्ष मिनाक्षी सुर्यवंशी, सचिव विभावरी रोकडे, शंकुतला वाळुंज, छाया लष्करे, संध्या गावडे, आदींनी केले आहे.     

Post a Comment

0 Comments