प्रसाद धेंडची भूमिका असलेला 'केसरी ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


प्रसाद  धेंडची  भूमिका  असलेला 'केसरी ' लवकरच प्रेक्षकांच्या  भेटीला 

वेब टीम नगर ,दि. २६- प्रसाद नंदकुमार धेंड याची केसरी या  कुस्तीवर आधारित मराठमोळ्या  चित्रपटामध्ये एक कुस्तीगिराची महत्वाची भूमिका  आहे. त्या  भूमिकेचे नाव "युवराज सांडे पाटील" आहे आणि त्याने एका आमदाराच्या मुलाची भूमिका साकारली आहे हे. आमदाराची  भूमिका अभिनेते "मोहन जोशी" यांनी केली आहे.
  प्रसादला महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अमोल बुचडे यांचे  कुस्ती शिकण्यासाठी  खूप मोलाचेमार्गदर्शन मिळाले  आहे. ४० दिवसाच्या खडतर ट्रैनिंग मधून तो कुस्ती शिकला  व ती भूमिका वठवली  आहे.   या भूमिकेसाठी लागणारे शरीर  आधीच कमावले आहे  . चित्रपटा मध्ये निवड होण्या आधी वर्षभर  त्याने अत्यंत प्रामाणिकतेने मेहनत केली होती .  .संपूर्ण भारतात हा चित्रपट दि .२८ फेब ,रॉजी प्रदर्शित होत आहे. 
   
  या चित्रपटाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पारितोषिक विजेते आणि शाळा, फुंतरू ,आजोबा या चित्रपटाचे दिग्दर्शक "सुजय डहाके" यांचे आहे ,  पटकथा नियाज मुजावर यांची आहे . तर निर्माते संतोष रामचंदानी आहेत. या चित्रपटात प्रसिद्ध व अमुभवी  अभिनेते  विराट मडके, विक्रम गोखले,मोहन जोशी, महेश मांजरेकर ,प्रवीण तरडे, नंदेश उमाप, छाया कदम, उमेश जगताप,जयवंत वाडकर,पद्मनाभ बिंड, नचिकेत पूर्णपात्रे, सत्याप्पा मोरे, ज्ञानरत्न अहिवळे, रूपा बोरगावकर ,जयेश सांघवी , संदीप तिकोने या  मातबर कलाकारांच्या   महत्वाच्या भूमिका आहेत.
  या चित्रपटामध्ये महेश मांजरेकरांनी स्वतःहि  कुस्ती खेळली आहे.
  संगीत ए. व्ही . प्रफुल्लचंद्र तर पार्श्वसंगीत साकेत कानेटकर  यांनी दिले आहे तर गीतकार क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय साठे , हे आहेत तर या चित्रपटाची गाणी  मोहन कनन, मनीष राजगिरे, ऋचा बोन्द्रे , जयदीप वैद्य आणि रॅपर युग या गायकांनी गायली आहेत  . या चित्रपटाचे छायाचित्रीकरण संदीप यादव ,यांचे तर. मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.  प्रसादचे मराठी चित्रपटातील हे  पदार्पण असून त्याच्या या निवडी बद्धल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे         

Post a Comment

0 Comments