देशभरातील १३२० रुग्णालयात केली साफ सफाई
निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सिव्हील हॉस्पिटलचा परिसर केला ‘स्वच्छ’वेब टीम नगर,दि. २६ - संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या नगर शाखेच्यावतीने विद्यमाने सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेने बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या ६६ व्या जयंतीचे औचित्य साधून येथील सिव्हील हॉस्पिटलच्या परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबवित आगळ्यावेगळ्या पद्धतीने गुरुपूजा दिन साजरा करण्यात आला. यावेळी निरंकारी सेवा दलच्या महिला व पुरुष सदस्यांनी तसेच चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी एकत्रितपणे ‘सिव्हील’चा संपूर्ण परिसर झाडलोट करुन स्वच्छ केला, यात २०० हून अधिक सेवादल, स्वयंसेवक, अनुयायी नि:स्वार्थ भावनेने सहभागी झाले होते.
सकाळी ८. ३०वा. सिव्हील हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाजवळ सर्वजण एकत्रित झाले. ‘सामुहिक प्रार्थना’ म्हणत ‘हम है सेवादार’ची ग्वाही देत व सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांचा जयघोष करीत सफाई अभियानाला सुरुवात करण्यात आली. सफाई अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक भैय्या गंधे, नगरसेविका ज्योती गाडे, सिव्हीलचे डॉ.मनोज घुगे, डॉ.अरुण सोनवणे, डॉ.खरपुडे, स्वच्छता दूत मनोहर खुबचंदानी, मंडळाचे झोनल इंचार्ज हरिष खुबचंदानी, सेवा दलाचे क्षेत्रीय संचालक आनंद कृष्णानी यांच्यासह इतर मान्यवर व सिव्हील चा स्टाफ उपस्थित होता.
सफाई अभियान दुपारी १२ वाजेपर्यंत अखंडपणे राबविण्यात आले. यात स्वयंसेवकांनी सिव्हील हॉस्पिटलचे प्रवेशद्वार, बाह्यरुग्ण विभाग बाहेरील परिसर, नेत्रकक्ष परिसर, क्षयरोग इमारत मागील परिसर, प्रशिक्षण इमारत जवळील परिसर, शवविच्छेदन कक्ष बाहेरील परिसर, पार्किंग परिसर आदि ठिकाणी झाडलोट करुन वाढलेले गवत, झाडे झुडूपे तोडून सफाई करण्यात आली. मोठ्या प्रमाणावर पोत्यांमध्ये कचरा भरुन कचरा गाड्यांमध्ये भरुन देण्यात आला. एकंदरीत सर्व स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध, शिस्तीने, तन्मयतेने व नि:स्वार्थ भावनेने गुरुदेवजींच्या सामाजिक बांधिलकीचा आदेश पाळीत सफाई अभियान राबविल्यामुळे ‘सिव्हील’चा संपूर्ण परिसर कचरामुक्त स्वच्छ दिसत होता. सफाई अभियान सुरु असतांना आ.संग्राम जगताप, अविनाश घुले, अभिजित खोसे आदि मान्यवरांनी भेट देऊन निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करीत गौरवोद्गार काढले.
असेच विशेष सफाई अभियान चॅरिटेबल फाऊंडेशनच्यावतीने देशभरातील ४००शहरांमधील १३२० सरकारी रुग्णालयांमध्ये तसेच नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक बागा, उद्याने आदि ठिकाणी साफसफाई व वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीप्रमुख किशोर खुबचंदानी यांनी दिली.
0 Comments