शंख नाद कार्यक्रमात 400 साधकांचा उत्स्फुर्त सहभाग

  शंख नाद कार्यक्रमात  400 साधकांचा उत्स्फुर्त सहभाग

महाशिवरात्री निमित्त आर्ट ऑफ लिव्हींगचा उपक्रम 
 
 वेब टीम नगर,दि. २६ -     आर्ट ऑफ लिव्हींग नगर ज्ञान क्षेत्र, येथे  महाशिवरात्री निमित्त विशेष आयोजित शंख नाद या सत्संग ,ध्यान व ज्ञान कार्यक्रमात , सुमारे 400 पेक्षा जास्त साधकांनी सहभाग घेऊन शिव शक्तीचा अनुभव घेतला. आर्ट ऑफ लिव्िंहग नगरच्या वतीने श्री श्री रवी शंकरजी यांच्या प्रेरणेने आयोजित या महाशिवरात्र उत्सव विशेष महत्व आहे. सर्व उपस्थित श्री पंडित व कृष्णा पेंडम यांच्या हस्ते महागुरुपूजा करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. आर्ट ऑफ लिव्हींग साधक गायक हेमंत नरसाळे व गायिका कृतिका बेलेकर यांच्या सत्संगाने भाविक शिव नादात एकरूप झाले. प्रशिक्षक सुनीता घाडगे  व महेश कुलकर्णी यांच्या शंख नादात संपूर्ण कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला. कार्यक्रमात श्री श्री गुरुजींच्या मार्गदर्शनात ध्यान करून , साधकांनी शिवतत्वाची विशेष अनुभुती घेतली. आर्ट ऑफ लिव्हिग साधक व तबला वादक  प्रकाश लगड  यांची मोलाची साथ मिळाली .
     अनेक विशेष मान्यवर यावेळी उपस्थित होते. आर्ट ऑफ लिव्हिग चे सर्व शिक्षक, स्वयंसेवक व सर्वांनी कार्यक्रमात सेवा सहभाग करून आनंद घेतला.
     आर्ट ऑफ लिव्हिग ज्ञान क्षेत्र समिती सदस्य व  साधक  जयश्री गिरवलकर व साधक  बाळासाहेब कदम आदींच्या  सहकार्याने संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments