अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी अडसर ठरणारा नियम लागू



अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी अडसर ठरणारा नियम  लागू

 भारतीय, चिनी नागरिकांना बसणार सर्वाधिक फटका

वेब टीम दिल्ली ,दि. २४ -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सोमवारी भारतात येत असतानाच अमेरिकेत कायम वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड मिळण्यात अनेक अडचणी निर्माण करणारा नियम लागू करण्यात येत आहे.
यामुळे एच १ बी व्हिसाधारकांना अडचणी येणार आहेत. या प्रकारचा व्हिसा असलेल्या नागरिकांत भारत व चीनच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. ज्या लोकांनी अन्न कूपनांसह सार्वजनिक आर्थिक लाभाच्या योजनांचा फायदा घेतला आहे त्यांना ग्रीनकार्ड देण्यात येणार नाही, असे सूचित होत आहे.
स्थायी निवास सुविधा म्हणजे ग्रीन कार्ड मागणाऱ्या व्यक्तींना त्यांनी अमेरिकेत आल्यानंतर आर्थिक लाभांच्या योजनांचा फायदा घेतलेला नाही हे सिद्ध करावे लागेल. स्थलांतर धोरण संस्था अहवाल २०१८ अनुसार बांगलादेशातील ६१ टक्के, पाकिस्तानातील ४८ टक्के, भारतातील ११ टक्के कुटुंबांनी आर्थिक लाभांच्या योजनांचा फायदा घेतला होता त्यांची तपासणी केली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments