वाढदिवस साजरा करतांना 'पूर्वा 'ने जपली सामाजिक बांधिलकी


वाढदिवस साजरा करतांना 'पूर्वा 'ने जपली सामाजिक बांधिलकी 

वेब टीम नगर ,दि. २३ - आजकाल बडेजावपणाने वाढदिवस साजरा करण्याची वृत्ती एकीकडे  वाढत असतांना दुसरीकडे सामाजिक भावनेतून वंचितांना आपल्या आनंदात सहभागी करून त्याच्या बरोबर वाढदिवस साजरा करण्याच उदाहरण  समाजात तसं क्वचितच पाहायला मिळत. अशोकभाऊ फिरोदिया प्रशालेत सहावीत शिकणाऱ्या पूर्वा श्रीराम  परंडकर हिने तिचा वाढदिवस अभिक्षणगृहातील विद्यार्थ्यासह साजरा केला . यावेळी तिने अभिक्षणगृहातील प्रत्येक मुलांला  शालोपयोगी साहित्य भेटवस्तू म्हणून दिल्या शिवाय  आपले वडील श्रीराम परंडकर यांना अभिक्षणगृहाला रोख देणगीही द्यायला लावली  .कमिन्स कंपनीत नोकरीला असलेल्या परंडकर यांनीही आनंदाने देणगी दिली. त्याच बरोबर इतरांनीही सामाजिक बांधिलकीतून आपले वाढदिवस असेच साजरे करावेत अशी अपेक्षा पूर्वा आणि तिच्या आई वडिलांनी  व्यक्त केली. अभिक्षणगृहातील विद्यार्थ्यांनी आणि पदाधिकाऱ्यानी या चिमुकलीचे कौतुक केले.    

Post a Comment

0 Comments