मीरा -भाईंदर मनपांच्या महापौर पदासाठी रस्सीखेच
भाजपास गटबाजीने ग्रासले
वेब टीम ठाणे,दि. २३ - मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. आपले नगरसेवक फुटू नये यासाठी भाजप आपल्या नगरसेवकांना गोव्यातील ललीत हॉटेलमध्ये ठेवलं आहे. तर शिवसेनेचे काही नगरसेवक माथेरानमध्ये आहेत. महापौरपदासाठी भाजपमध्ये गटबाजी सुरु आहे.तर दुसरीकडे काँग्रेसचे ३ आणि शिवसेनेचा १ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आहे. यात काँग्रेस नगरसेवक सारा अक्रम खान आणि अहमद शेख तर शिवसेनेच्या दिप्ती भट्ट हे सध्या नॉट रिचेबल आहेत.घोडेबाजार थांबवण्यासाठी भाजपने आपल्या नगरसेवकांना गोव्यातील ललीत हॉटेलमध्ये ठेवले आहे. तर शिवसेनचे काही नगरसेवक माथेरानमध्ये आहेत. महापौर पदासाठी भाजपमध्ये गटबाजी सुरू आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता आणि आमदार गीता जैन यांनी आपल्या गटाचा महापौर बसवण्यासाठी फिल्डिंग लावलं आहे.
गीता जैन गटाकडून महापौर पदासाठी दावेदार असलेल्या नीला सोन्स मेहता गटात सहभागी झाल्या आहेत. तर नरेंद्र मेहता यांची काय खेळी सुरु आहे. हेच भाजप नगरसेवकांना कळत नाही. नीला सोन्सला नरेंद्र मेहताचे समर्थन असल्याचे समोर येत आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अंकुश मालूसरे यांनी मिरा भाईंदर महानगरपालिकेवर महाविकासआघाडीचा महापौर बसणार आहे.तर दुसरीकडे आमदार गीता जैन समर्थक नगरसेवक, कांग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महापौर बनवण्यासाठी छुपी खेळी सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे भाजपकडे बहुमताचा आकडा असताना नरेंद्र मेहता यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
भाजपकडे ६१ नगरसेवक, शिवसेनेकडे २२ आणि काँग्रेसकडे १२ नगरसेवक आहेत. महापौर पदासाठी ४८ आकड्याची गरज आहे.
0 Comments