सावता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निखिल शेलार

सावता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी निखिल शेलार


   वेब टीम  नगर,दि. २२ - माळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या सावता परिषदेच्या महाराष्ट्र राज्य अहमदनगर दक्षिण विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नागरदेवळे (ता.नगर) येथील निखिल धोंडीराम शेलार यांची दुसर्‍यांदा निवड झाली. सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे तसेच प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बीड येथे प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघटनेच्या विविध जिल्ह्यांच्या अध्यक्ष तसेच युव आघाडी जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी यांच्या अधिकृतरित्या निवडी झाल्याचे प्रदेश महासचिव मयुर वैद्य यांनी घोषित केल्या.
     निवडीनंतर निखिल शेलार म्हणाले, संघटना वाढीसाठी व समाजाच्या विविध प्रश्‍नांवर समाजातील सर्वांना सोबत घेऊन आपण काम करणार असल्याचे सांगितले. निखिल शेलार यांनी २०१२ पासून संघटनेचे तालुकाध्यक्षपद तसेच पाच वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी जिल्हाभर राबविलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना संघटनेने दुसर्‍यांदा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments