प्रा. रमेश आठरे यांनी न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे नाव मोठे केले

प्रा. रमेश आठरे यांनी न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे नाव मोठे केले

 प्राचार्य डॉ बी एच झावरे - अतिशय अभ्यासू शिक्षक म्हणून प्रा रमेश आठरे यांचा  नावलौकिक 
वेब टीम नगर,दि. २२- आजकाल शिक्षणक्षेत्र ही सेवा न रहाता व्यवसाय बनलाय . पण आठरेसरांसारखे अध्यापक ज्यांनी या संस्थेला आपले मानून काम केले . त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदापर्यंत पोहोचले व आज प्रत्येक क्षेत्रात न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे गुणी माजी विद्यार्थी आहेत . हे  आठरे सारख्या गुणी शिक्षकांमुळे हे शक्य झाले त्यामुळे न्यू आर्ट्स महाविद्यालयाचे नाव मोठे झाले अशा शब्दात प्राचार्य डॉ . बी एच झावरे यांनी प्रा रमेश आठरे यांचे कौतुक केले . 
   तब्ब्ल ३६ वर्षांची प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या प्रा . रमेश आठरे यांच्या सेवा पूर्ती समारंभात ते अध्यक्षपदावरून बोलत होते यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ . अरुण पंधरकर , देशमुख सर , प्रा . डॉ . अनिल आठरे , प्रा भाऊसाहेब कचरे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त माणिकराव मोरे , नगरसेवक निखिल वारे , संस्थेच्या सेवक कल्याण निधीचे अध्यक्ष सीताराम मुळे हे होते .
   सुरुवातीला श्री व सौ प्रा .रमेश आठरे दाम्पत्याचा यांचा सेवापुर्ती निमित्त प्रा . डॉ. झावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .  सत्काराला उत्तर देतांना आठरे यांनी आपल्या अध्यापन काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि सेवेत सहकार्य करणाऱ्या सर्वांचे तसेच कुटुंबीय व नातेवाईकांचे आभार मानले . आपल्या अध्यापन काळात मी गुणवत्तेबरोबरच शिस्तीला महत्व दिले त्यामुळे पर्यवेक्षक म्हणून काम करतांना महाविद्यालयाच्या आवारात एकही गुंड रोड रोमिओ फिरकू दिला नाही विद्यार्थिनीसाठी सुरक्षित वातावरण तयार करून दिले . हे महाविद्यालय मुलींसाठी सुरक्षित आहे असा विश्वास पालकांना आल्यामुळे आज महाविद्यालयात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक आहे . त्यामुळे महाविद्यालयाचा उपप्राचार्य म्हणून निवृत्त होताना मी शतशः ऋणी आहे . असे ते म्हणाले यावेळी . त्यांची मुलगी योगिता आठरे , जावई सून तसेच प्रा . भाऊसाहेब कचरे , प्रा संजय जाजगे , प्रा कांबळे यांची भाषणे झाली .
प्रा राजेंद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

Post a Comment

0 Comments