न्यूनगंड न बाळगता जास्तीत जास्त शुद्ध मराठी बोला, वाचा व्यवहारात आणा



न्यूनगंड न बाळगता शुद्ध मराठी बोला, वाचा  व्यवहारात आणा

 प्रा. मेघा काळे यांचे आवाहन : कौटुंबिक न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

वेब टीम नगर,दि. २० – संतमंडळीनी मराठीला जोपासले, वाढवले व मराठीबद्दल अभिमान बाळगला. तसा अभिमान आपण सध्या  बाळगत नाहीये. त्यामुळे मराठी भाषेवर हिंदी, इंग्रजी व इतर भाषांचे अतिक्रमण होत आहे. आता इंग्रजी युक्त मराठी सर्रास बोलली जात आहे. जर आपली मराठी भाषा वाचवायची असेलतर न्यूनगंड न बाळगता जस्तीत जास्त शुद्ध मराठी बोला, वाचा व व्यवहारात आणा. इतर भाषाही महत्वाच्या आहेत. मात्र मराठीच्या संवर्धनासाची जबा बदारी आपलीच आहे. न्यायालयीन कामकाज मरठीतून चालण्यासाठी कौटुंबिक न्यालयाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सारखा स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल न्यायाधीशांचे अभिनंदन, असे प्रतिपादन प्रसिद्ध व जेष्ठ साहित्यिक का प्रा. मेघा काळे यांनी केले.

          कौटुंबिक न्यायालयात आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमास जेष्ठ साहित्यीका प्रा. मेघा काळे यांच्या उपस्थितीत सुरवात झाली. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मराठी साहित्य परिषदेचे कार्यध्यक्ष किशोर मरकड, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, माजी अध्यक्ष ॲड. शेखर दरंदले, सेन्ट्रल बारच्या उपाध्यक्षा ॲड. सुजाता गुंदेचा, विशेष सरकारी वकील सुरेश लगड, न्यालायाचे अधिक्षक नवाज शेख आदींसह वकील व कर्मचारी उपस्थित होते.
          किशोर मरकड म्हणाले, मराठी साहित्य अतिशय सुंदर व मनाला आनंद देणारे आहे. वाचनाने नवी स्फूर्ती मिळते. न्यायाधीशांना व वकिलांना वेळ कमी असतो, तरी ज्यांना मराठी साहित्यात रस आहे त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यात सहभागी व्हावे.
         ॲड. भूषण बऱ्हाटे म्हणाले, न्यायालयाच्या कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा, पक्षकारांना आपल्या न्यायनिवाडा व्यवस्थित समजावा यासठी उच्चन्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयांमध्ये मराठी भाषा संवर्धनाचा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात न्यायधीश व वकील उत्फूर्त सहभगी होत आहेत.

          न्या. नेत्रा कंक म्हणाल्या, अहमदनगरच्या मातीत मराठी रुजलेली असल्याने मातीला मराठीचा वास येतोय. कौटुंबिक न्यायालयात जास्तीत जास्त काम मराठी भाषेतूनच चालते. नायालायातील ८०० दाव्यापैकी ७९८ दावे मराठीतून चालले आहेत. मी सर्व न्यायनिवाडा मराठीतूनच करत आहे. यापुढेही ही परंपरा अशीच पुढे नेत मराठी भाषेचे संवर्धनास हातभार लावणार आहे.

          यावेळी ॲड.शेखर दरंदले यांनीही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम सुचवले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड. सागर पादीर यांनी केले. आभार ॲड. विक्रम वाडेकर यांनी मानले. यावेळी समंवयक सुषमा बिडवे, ॲड.. अनुराधा आठरे, ॲड. मंगेश सोले, ॲड. सुभाष भोर, ॲड. अरुणा राशिनकर, ॲड. अर्चना सेलोत आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments