'शिवचरित्र स्पर्धा २०२०’ चे आयोजन करून 'व्हैलेन्टाइन डे’ साजरा


सारडा महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम

'शिवचरित्र स्पर्धा २०२०’ चे आयोजन करून  'व्हैलेन्टाइन डे’ साजरा

वेब टीम नगर,दि. २० - ‘व्हैलेन्टाइन डे’ हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. महाविद्यालयीन तरुण विविध मार्गांनी साजरा करतात. मात्र नगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाने हा दिवस ‘शिवचरित्र स्पर्धा २०२०’ चे आयोजित करून अनोख्या पद्धतीने साजरा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कालातीत आहे. आपल्या पिढ्यानपिढ्यांची जोपासना शिवप्रेरणेवर झाली आहे. मराठी माणसाची अस्मिता शिवाजी महाराजाच्या इतिहासाशी जोडली गेलेली आहे. तरुणांचे मन, मेंदू अन् मनगट बळकट होण्यासाठी व निकोप मानसिकता निर्माण होण्यासाठी शिवाजी महाराजांचा इतिहास नीट समजणे आवश्यक आहे. त्यासाठी पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वतीने ‘शिवचरित्र स्पर्धा -२०२०’ आयोजित केली होते.
या स्पर्धेत छत्रपती शिवाजी महाराज –जीवन व कार्य यावर आधारित बहुपर्यायी लेखी परीक्षा घेण्यात आली. या स्पर्धेत १२० विद्यार्थी सहभागी झाले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुरेखा गांगुर्डे, डॉ. कृष्णा पाटील, प्रा. शैलेश देशमुख प्रा. प्रमोद तांबे, प्रा. नवनाथ भोंदे, या प्राध्यापकांनी, तसेच राकेश पवार, श्रीपाद सैंदाणे, सचिन माळी, सचिन पाखरे, निकिता साळवे, समृद्धी गागरे, प्रगती गीते, प्राजक्ता आघाव, ज्ञानेश्वरी गीते या विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

सदर उपक्रमास हिंद सेवा मंडळाचेअध्यक्ष शिरीष मोडक,  कार्याध्यक्ष अजित बोरा, मानद सचिव संजय जोशी,  चेअरमन अनंत फडणीस, माजी सचिव सुनील रामदासी, प्राचार्या डॉ. अमरजा रेखी, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे यांनी मार्गदर्शन  केले.

Post a Comment

0 Comments