शिक्षक,पालक व समाजाच्याअपेक्षा पूर्ण करा व उज्वल यश मिळवा

     

शिक्षक,पालक व समाजाच्याअपेक्षा पूर्ण करा व उज्वल यश मिळवा

डॉ.पारस कोठारी -  भाईसथ्था नाईट हायस्कूलचा १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ                                                
वेब टीम नगर,दि. २० -निरोप समारंभ नव्हे तर प्रवासासाठी शुभेच्छापूर्वक पाठवणी आहे.भाईसथ्था नाईट हायस्कूलची निकालाची चांगली परम्परा आहे.मुंबईच्या मासूम संस्थेने विद्यार्थ्यांना २१ अपेक्षित प्रश्नसंच,शैक्षणिक साहित्य,अल्पोपहार,वाचनालय,फिरती प्रयोगशाळा अश्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.जिद्द,चिकाटी ठेवूनअभ्यास करा यश नक्की मिळेल.शाळेतील शिक्षक,पालक व समाजाच्याअपेक्षा पूर्ण करा व उज्वल यश मिळवा.असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे अध्यक्ष  डॉ.पारस कोठारी यांनी केले.
 हिंदसेवा मंडळाच्या ज्युनिअर कॉलेज,भाईसथ्था नाईट हायस्कूलमध्ये १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ  झाला याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे उपकार्याध्यक्ष तथा भाईसथ्था नाईट हायस्कूलचे अध्यक्ष  डॉ.पारस कोठारी बोलत होते.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांनी वॉटर प्युरिफायर   शाळेस भेट दिले.याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थी दै.नगर टाइम्स चे व्यवस्थापक रवींद्र देशपांडे,हिंदसेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा,मासूम संस्थेचे कार्यप्रमुख संदीप सूर्यवंशी,शालेय समिती सदस्य विलास बिडवे,प्राचार्य सुनिल सुसरे,देविदास खामकर,गजेंद्र गाडगीळ,महादेव राऊत आदी उपस्थित होते.                                       
रवींद्र देशपांडे म्हणाले कि,दहावी व बारावी नंतर अनेक क्षेत्रात शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.नेमके कोणते क्षेत्र निवडावे याबाबत विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये संभ्रमावस्था आहे.विद्यार्थ्यांनी आवडीनुसार व बौद्धिक कुवतीप्रमाणे शिक्षण क्षेत्र निवडावे.अर्धवट राहिलेले शिक्षण रात्र शाळेत प्रवेश घेऊन पूर्ण करण्याची जिद्द महत्वाची आहे.                                                                       
 अजित बोरा म्हणाले कि,परीक्षेला सामोरे जाताना कोनातीही भीती मनात बाळगू नये.शांतपणे परीक्षा द्यावी.चांगला अभ्यास करा व उत्तम यश मिळवा.  मासूमचे कार्यप्रमुख संदीप सूर्यवंशी म्हणाले कि,सर्वाना परीक्षेसाठी शुभेच्छा.उज्वल यश मिळवा व शाळेचे नाव मोठे करा.                                                                       कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांनी केले होते.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.विद्यार्थ्यांना निरोप समारंभात गहिवरून आले व या शाळेत येऊन आम्हाला पुन्हा बालपण आठवले.परत शाळेत येता येणार नाही अशी खन्त व्यक्त केली.                                                                                                                              भाईसथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे यांनी प्रास्तविक केले.सूत्रसंचालन सिमरन शेख यांनी केले तर आभार प्रा.शरद पवार यांनी मानले.या कार्यक्रमात शिक्षक,विद्यार्थी मोठ्या संख्येनी उपस्थित होते .  

Post a Comment

0 Comments