महिलांच्या हाती असलेल्या क्षेत्राची भरभराट होवून स्थैर्यही प्राप्त होते



महिला असलेल्या क्षेत्राची  भरभराट होवून स्थैर्यही प्राप्त होते

राजश्री नागणे - बँक्स असोसिएशनच्यावतीने महिला संचालक व कर्मचार्‍यांसाठी ज्ञानसत्र

  वेब टीम नगर,दि. २० - महिला विकासावरच समाजाचा विकास अवलंबून असतो ज्या क्षेत्रात निर्णयाधिकार महिलांच्या हाती असतात त्या क्षेत्राची अधिक भरभराट होवून स्थैर्यही प्राप्त होते. महिलांविषयी पुरूषांच्या विचारांमध्ये झालेले परिवर्तन देशात त्याचे प्रभाव जाणवल्यावाचून राहणार नाही असे मत महिला सबलीकरण व सशक्तीकरण क्षेत्रातील पुण्यातील विधायक रचनात्मक सामाजिक कार्यकर्त्या  राजश्री नागणे पाटील यांनी व्यक्त केले.
     अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने नागरी सहकारी बँकातील महिला संचालक व महिला कर्मचार्‍यांसाठी आयोजित विशेष ज्ञानसत्राचे उदघाटन करतांना त्या बोलत होत्या. या ज्ञानसत्रात नगर, जळगांव, धुळे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर नासिक, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड जिल्हयातील नागरी सहकारी बँकांतील संचालिका व महिला कर्मचारी मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
     स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मानवतेच्या मानसिकेतून महिलांच्या सशक्तीकरणाचे होणारे कार्य देशाच्या प्रगतीला अधिक गतीमान करणारे आहे. या कार्यास नम्रता धैर्य व समर्पणवृत्तीची जोड दिल्यास आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनण्याचा ध्यास सवारना प्रेरणादायी ठरणार आहे. त्यात महिलांना अधिक प्रमाणात योगदान देण्याचे आवाहन  नागणे पाटील यांनी केले.
     महाराष्ट अर्बन को-ऑप बँक्स फे डरेशनच्या संचालिका, नासिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा व सहकार भारतीच्या राष्टीय उपाध्यक्षा डॉ. शशीताई आहिरे यांनी महिलांच्या आर्थिक सबलीकरणात नागरी सहकारी बँकांची भूमिका या विषयावर बोलतांना अर्थव्यवस्थेतील क्रांतीकारक बदल, संगणकांची लाट, कामकाजातील अत्याधुनिक पध्दती, स्पर्धात्मक परिस्थिती, मुक्त अर्थव्यवस्था, रिझर्व्ह बँक व शासनाचे धोरण या सार्‍यांचा परिणाम रोजच्या जीवनावर होत असल्याचे सांगितले.
लेखिका  वंदना धर्माधिकारी यांनी बँकिंग क्षेत्रातील बदलांना सामोरे जाण्याची महिलांची क्षमता, आव्हाने संधी, प्रभावी व्यवस्थापन कौशल्याद्वारे बँकिंग व्यवसायवृध्दी या विषयी सविस्तर विश्‍लेषण केले.
पुण्याच्या वरिष्ठ बँक अधिकारी  रेणूका खटावकर यांनी प्रशासन कौशल्य अभिवृध्दी व प्रश्‍न सोडविण्याचे कौशल्य व सांघीक भावना याविषयी मार्गदर्शन केले.
 सहकार भारतीच्या केंद्रीय सहसचिव प्रा.सौ सुजाता खटावकर पुणे यांनी कुटुंबातील बहुतांशी निर्णय दिसायला छोटे वाटले तरी त्वरीत निर्णय महिलाच घेतात. हे हितकारक निर्णय सहमतीने व्हावेत यासाठी सवारची मनोभूमिका तयार करण्यात त्यांचा सिहांचा वाटा आहे. सामुहिक निर्णय क्षमता, एकाच वेळी विविध प्रकारचे कामे हाताळण्याचे कौशल्य, मानवसंसाधन, निधी गुंतवूणक, बचत वृत्ती या महिलांच्या गुण वैशिष्टयांचा उहापोह करून आत्मविश्‍वास जागृत्ततेने निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढविण्याचे त्यांनी आवाहन केले.
     पुण्याच्या सामाजिक आरोग्य समुपदेशक, अभ्यासक डॉ.  दिपलक्ष्मी पेशवे यांनी ‘महिलांचे आरोग्य व ताणतणाव, महिलां समोरील आव्हाने व त्यावरील उपाय, या विषयांवर मार्गदर्शन केले.
     या ज्ञानसत्रात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीसाठी दिवसभरात संपन्न विविध सत्रातील ज्ञानग्रहणतेवर आधारावर मनोगते व्यक्त करण्याची स्पर्धा अचानकपणे जाहीर करणेत आली त्यातील विजेत्यांना बँकिंग विषयावरील पुस्तके भेट देवून त्यांचा समारोप सत्रात विशेष सन्मान करणेत आला.
     असोसिएशनचे अध्यक्ष सी.ए. गिरीश घैसास यांनी जिल्हयातील महिलांच्या सहकार बँकिंग क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाचा व परंपरेचा गौरवपर उल्लेख करून असोसिएशनच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रमांचा आढावा घेतला. अंबिका महिला सहकारी बँकेच्या संस्थापिका व महाराष्ट स्टेट को-ऑप बॅक्स असोसिएशनच्या संचालिका प्रा. मेधा काळे यांनी प्रास्ताविक केले व अंबिका महिला सहकारी बँकेच्या संचालिका आशा मिस्कीन यांनी प्रमुख अतिथीचा सन्मान केला. असोसिएशनचे उपाध्यक्ष नाथा राऊत यांनी आभार मानले व कार्यलक्षी संचालकअशोक कुरापाटी यांनी सूत्रसंचलन केले.

Post a Comment

0 Comments