नारी सन्मान , गौरव हि भारतीय संस्कृती
युगल शरणजी महाराज - लक्ष्मी कथेत ''श्रीकृष्ण व राधा झुला'' झाकीचे दर्शनवेब टीम नगर,दि. १९ -नारी सन्मान व गौरव हि भारतीय संस्कृती आहे.जेथे नारींचा योग्य सन्मान केला जातो तेथेच लक्ष्मी माता वास करते.जी नारी मातृत्व स्वरूप प्राप्त करते ती नारी पूजनीय व कीर्ती स्वरूप आहे.आई बनण्यासाठी नारी आई वडील,कुल गोत्र सोडून पतीचे नवे संबंध व नवे संस्कार आत्मसात करते.भारत देशामध्ये पशु,वनस्पती ,नदी,गाई,देश यांना तुळसीमाता ,गोमाता,गंगामाता,भारतमाता संबोधततात.या जगाच्या पाठीवर भारत देश असा आहे कि, येथे भारत देशाचा भारतमाता म्हणून गौरव व सन्मान केला जातो.भक्तिमय वातावरणात मधुर वाणीने वैष्णवाचार्य युगल शरणजी महाराज यांनी ''श्री लक्ष्मी महात्म्य कथे'' चे पाचवे पुष्प गुंफले.
खाकीदास बाबा मठ येथे वैष्णवी सुंदरकांड एवं भजन मंडळ आयोजित ''लक्ष्मी महात्म्य कथा'च्या पाचव्या दिवशी सुन्दर व आकर्षक ''श्रीकृष्ण व राधा झुला'' झाकीचे दर्शनाने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.भाविकांनी आनंदोत्सव साजरा करून फुलांचा वर्षाव केला.
(श्रीकृष्ण-अमित लढ्ढा) व (राधाराणी-सुरवि लढ्ढा)यांनी सुदंर मनोहक वेशभूषा सादर केली.''श्री लक्ष्मी कथा'' श्रवण करण्यासाठी नगर शहर व परिसरातून भाविक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.कथेच्या समारोप प्रसंगी पूर्णाहुती आहुती देऊन होमहवन करण्यात आले.या प्रसंगी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.कथा यशस्वी करण्यासाठी वैष्णवी सुंदरकांड एवं भजन मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments