घुमजाव




जितेंद्र आव्हाड यांचे घुमजाव

वेब टीम मुंबई दि.३०- इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटल्याचे विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने आज जितेंद्र आव्हाड यांनी घूमजाव करीत इंदिराजींवर स्तुतिसुमने उधळण्यास  सुरुवात केली.
इंदिराजींमुळे पाकिस्तानची फाळणी झाली, पोखरण येथील अणुचाचणी यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली इतकेच नव्हे तर बँकांचे राष्ट्रीयीकरण झाल्याचे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले मात्र काल केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आमच्या नेत्यांबद्दल अनुदार विधान सहन करणार नाही असा थेट इशारा दिल्यानंतर मात्र आज जितेंद्र आव्हाड यांनी मूळ विधानाशी  युटर्न घेत इंदिराजींवर स्तुती सुमने उधळण्यास  सुरुवात केली. 

Post a Comment

0 Comments