तरुणांनी गांधीवाद स्वीकारावा 


वेब टीम नगर,दि.३०- महात्मा गांधींच्या विचारांची आज देशाला गरज असून त्या मार्गावर वाटचाल केल्यास देशातील शांतता सलोखा आणि एकात्मता अबाधित राहील असे प्रतिपादन काँग्रेस शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष आर. आर. पिल्ले यांनी मनोगत व्यक्त करतांना गांधीजींची विचारप्रणाली नवतरुणांनी स्वीकारून मूळ काँग्रेसला संजीवनी द्यावी असं आवाहन केलं .
महात्मा गांधीजीं  ७२वी  पुण्यतिथी आज सकाळी वाडिया पार्क  येथे शहर काँग्रेसच्या वतीने महात्माजींना अभिवादनाने करण्यात आली .
पक्षाच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सकट ,प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर ,ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल परदेशी, संजय झोडगे ,सुभाष रणदिवे अॅड.नरेंद्र भिंगारदिवे ,राजेश बाठिया ,मुकुंद लखापती आदी यावेळी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments