सत्संग भवनाचे भूमीपूजन






सत्संग भवनाचे भूमीपूजन 
वेब टीम नगर ,दि. २९-सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेले राजस्थान येथील द्वारकाधीशांचे अवतार लोकदैवत श्री रामदेवजीबाबा ,श्री सालासर हनुमान व सचिय्या माता यांच्या नगर मधील  सारस नगर (चिपाडे मळा )येथील  नियोजित मंदिर व.सत्संग भवनाच्या कामाचे  भूमिपूजन  आ. संग्राम जगताप व  अमित कोठारी यां दाम्पत्याच्या हस्ते भूमीपूजन  करून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून करण्यात आले .या मंदिराची व सत्संग भवनाची  निर्मिती नगरच्या  श्री रामदेव भक्त मंडळ ट्रस्ट च्या वतीने करण्यात येणार असून या निर्मितीसाठी  रसिक, अनिल व कोठारी परिवारचे  मोठे योगदान लाभले आहे .
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मालू ,प्रकाश भागानगरे  ,मर्चन्ट बँकेचे संचालक संजय चोपडा ,सी .ए  .अजय मुथा ,विपुल शैटिया ,अविनाश  घुले , सागर पंधाडे ,जितेंद्र बिहाणी,अनिल कोठारी ,रसिक कोठारी ,पोपटलाल व रसिकलाल कटारिया ,दिलावर सिंग मनिष मुन्दडा ,दत्त गाडळकर  ,भाऊसाहेब पांडुळे ,व मोठ्या संख्येने भक्त मंडळी उपस्थित होते ..याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मालू म्हणाले कि या सर्व निर्मितीसाठी आमचे मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते गेल्या ७ वर्षांपासून प्रयत्नशील होते.जम्मा जागरणाच्या माध्यमातून व  श्री रामदेवबाबांच्या भजन संध्येच्या कार्यक्रमातून निधी जमा करण्याचा मंडळाचा प्रयत्न सुरू  होता.      त्यास आज मूर्त स्वरूप येत असून त्यामुळे भक्त मंडळींमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण आहे .९ गुंठे जागेत याची निर्मिती होत असून यात मंदिर ,अन्नछत्र  ,दोन सत्संग हॉल,मोकळ्या जागेत गार्डन , पार्किंग ,व तीन देव ,देवीच्या आकर्षक मूर्तींचा समावेश आहे ,या शुभारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाआरती ,करण्यात आली .भक्त मंडळींनी याप्रसंगी भक्ती गीते गाऊन ,आनंदाने नाचून  निर्मितीच्या प्रारंभाचा आनंद व्यक्त केला.  २०२० या वर्षातच पूर्ण करण्याचा मानस मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला असून याच्या निर्मितीसाठी ज्या दानशूरांना योगदान द्यावयाचे आहे.  त्यांनी अध्यक्ष राजेंद्र मालू मो . ९४२२९८३७७७या वर संपर्क साधावा,असे आवाहन श्री रामदेव भक्त मंडळ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे  

Post a Comment

0 Comments