बालक पालकांसाठी चित्रकला स्पर्धा ...






बालक पालकांसाठी चित्रकला स्पर्धा 
रचना कला महाविद्यालयाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम
वेब टीम  नगर, दि. २९ - रचना कला महाविद्यालयाच्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त बालक पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चित्रकला स्पर्धेचे  आयोजन करण्यात आल्याची माहिती रचना कला महाविद्यालयाचे सचिव प्रशांत शेकटकर यांनी दिली आहे .
विद्यार्थ्यांच्या,कलारसिकांचा सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील कलागुणांना विकसित करण्यासाठी महाविद्यालयाने यावर्षी वुई केअर मल्टी स्टोअर्स प्रा. लि .  पुणे आणि कोकयो  कॅमलिन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने या भव्य चित्र कला स्पर्धेचे आयोजन केले आहे .
दोन फेब्रुवारी रोजी दादा चौधरी विद्यालय येथे आयोजित या स्पर्धेत एकूण आठ गटात ही स्पर्धा होणार आहे .  गट क्रमांक १ बालवाडी  या गटात विषयाचे बंधन नाही गट -२ पहिली व  दुसरी या गटात, वाढदिवसाचा केक, आवडती खेळणी ,आवडते कार्टून असे विषय असून गट- तीन ३री  आणि ४ थी साठी फिशटँक ,आवडता मोबाईल गेम आणि घंटागाडी असे विषय असून चौथ्या गटात ५वी, ६ वी साठी आवडलेले धार्मिक स्थळ, महाराष्ट्रातील आवडता किल्ला आणि सीमेवरील भारतीय जवान तर पाचव्या गट ७ वी  ते आठवीसाठी  शहर स्वच्छता अभियान, चित्रपट किंवा मालिकेतील ऐतिहासिक प्रसंग, पारितोषिक वितरण, तर सहाव्या गटात नववी व दहावीसाठी रेल्वे किंवा एसटी मधील दृश्य, व्यायामशाळा शाळा ,परीक्षेतील एक दृश्य तर सातव्या गटात पालकांसाठी सध्याच्या राजकीय घडामोडी तर आठव्या गटात ज्येष्ठ नागरिकांसाठी विषयाचे व रंग साहित्याचे बंधन नाही .
स्पर्धेसाठी महाविद्यालयातर्फे फक्त कागद देण्यात येतील इतर साहित्य स्वतः आणावयाचे आहे स्पर्धेसाठी प्रवेश फी दहा रुपये असून हे शुल्क शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाविद्यालयात जमा करावे.जेष्ठ नागरिकांसाठी प्रवेशमूल्य नाही . सहभागी होणारया सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.   स्पर्धेचे पारितोषिक वितरण ९ फेब्रुवारी रोजी कै .  कमलाबाई ना.  नवले स्मारकात दुपारी ४ वाजता होईल अशी माहिती स्पर्धेच्या संयोजिका वर्षा शेकटकर यांनी दिली
या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य सुभाष भोर संचालक प्रमोद कांबळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments