भाजपातील वैफल्यग्रस्ताना थोरातांचा टोला
वेब टीम मुंबई ,दि. २९- राज्य सरकारच्या बरखास्तीची भाषा करणारे भाजपचे नेते सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
केंद्रात सत्ता असली म्हणून संविधानापेक्षा कुणी मोठे होत नाही, याच भान न ठेवता राज्य सरकार बरखास्तीची भाषा करणार्याना बाळासाहेब थोरात यांनी सुनावतांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचा नव्याने तपास करण्याची प्रक्रिया सुरु करताच केंद्र सरकारने हे प्रकरण अचानकपणे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्य सरकार एनआयएला सहकार्य करीत नसल्याचा भाजपचा आरोप आहे. केंद्र सरकारला राज्य सरकारने सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होऊ शकेल व अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून राज्य सरकार बरखास्त केले जाईल, असे भाजपचे नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना म्हटले आहे.
0 Comments