गणेश जयंती उत्साहात
गणेश जयंती उत्साहात 
दर्शनासाठी भाविकांच्या रांगा 
वेब टीम नगर दि.२८  - गणेश जयंती निमित्त सर्व गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी  गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळालं शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती मंदिर परिसरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. 
गणेश जयंतीनिमित्त मंदिरात आकर्षक  फुलांच्या सजावटीने गाभारा सजविण्यात आला आहे गणेश मूर्तीला अलंकारांनी सुशोभित करण्यात आले असून दुपारी बारा वाजता गणेश जन्म करण्यात येणार आला.
गणेश भक्तांनी गणरायाला अभिषेक कोणावर पूर्ती करण्यासाठी गर्दी केली होती त्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली होती सकाळी महेश शेळके गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने करण्यात आली तर भाविकांनीही दुपारी अथर्वशीर्षाची आवर्तने केली सायंकाळी हनुमान चालीसा पठण  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील अन्य गणेश मंदिरातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते मुळे वाड्यातील गणपती मंदिरातही  सकाळी साडेनऊ वाजता अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तने करून,पाळणा गाऊन गणेश जन्म साजरा करण्यात आला तर शमी गणपती मंदिरात ही गणरायाला अभिषेक करण्यासाठी गर्दी जमली होती तरी दातरंगे मळ्यातील एकदंत गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकी करतात मिरवणूक मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या काढण्यात आल्या होत्या अनेक ठिकाणी खिचडीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.


Post a Comment

0 Comments