का आहेत तीन दिवस बँका बंद ..?



                   


तीन दिवस बँका बंद 
वेब टीम मुंबई,दि .२८ - जर तुम्ही या आठवडा अखेर  आपल्या बँकांची कामं पूर्ण करण्याच्या विचारात असाल तर जरा थांबा. बँकांची कामं तुम्हाला गुरूवारअखेरच पूर्ण करावी लागणार आहेत. येत्या शुक्रवार आणि शनिवारी बँक कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहे. त्यामुळे बँकांचं कामकाज ठप्प होणार आहे. संपाचे दिवसही महत्त्वाचे आहेत. ३१ जानेवारी रोजी आर्थिक सर्व्हे तर १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस बँका बंद राहिल्यास कर्मचाऱ्यांचं वेतन मिळण्यासही उशिर होण्याची शक्यता आहे. तर एटीएममध्येही पैशांची कमी भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा बँक कर्मचारी संपावर जात आहेत. यापूर्वी ८ जानेवारी या दिवशी अनेक बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाल्यानं ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं.
प्रलंबित मागण्या
आपल्या अनेक मागण्यांसाठी इंडियन बँक असोसिएशनकडून संपाची हाक देण्यात आली आहे. त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य करण्यात आलेले नाही. समान कामाचं समान वेतन, कामाची निर्धारित वेळ ,  पेन्शन अशा मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे.

Post a Comment

0 Comments