शिवरायांची भवानी तलवार भारतात परत आणा; २ कोटी शिवभक्तांच्या सह्यांची मोहीम


वेब टीम : अहमदनगर
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची इंग्लंड येथील रॉयल कलेक्शन ट्रस्ट संग्रहालयात असलेली भवानी तलवार पुन्हा भारतात (महाराष्ट्रात) आणावी यासाठी शिवऋण युवा प्रतिष्ठानच्यावतीने 2 कोटी शिवभक्तांची सह्यांची मोहिम नगर शहरात सुरू करण्यात आली आहे.

दिल्लीगेट येथे या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते हभप आकाश महाराज फुले, अशोक दातरंगे, शंकर गोरे, संदीप पवार, ओमकार फुले, महेश कराळे, गणेश होळकर, गजेंद्र बाचल आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीच्या सहाय्याने महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचे कार्य केले व अखंड महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले. पण तिच तलवार आज दुर्दैवाने इंग्लंडमध्ये आहे. ती तलवार परत मिळावी म्हणून चाललेला प्रयत्न हा प्रयत्न विफल जाणार नाही.

कारण ज्यावेळी शिखांनी लढा उभारला त्यावेळेस इंग्लंडने शिखांच्या गुरुंची सर्व हत्यारे परत केली. तसेच 1979 मध्ये टिपु सुलतानची तलवार दिली मग छत्रपती शिवाजी महाराजांची का देत नाही. आता तलवार जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपण शिवभक्तांनी शांत बसायचे नाही.

प्राण गेला तरी चालेल पण माझ्या राजांची तलवार महाराष्ट्राला मिळवून देऊ या महाराष्ट्राच्या मातीची अस्मिता असणारी तलवार सर्व शिवभक्त रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत प्रयत्न करणार आहोत. 2 कोटी शिवभक्तांच्या सह्यांचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचे आकाश महाराज फुले यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments