प्रियंकाला फर्स्ट वेडिंग अॅनिवर्सरीला मिळाली आनंदाची बातमी, 'माराकेच' मध्ये सन्मानित केली जाणारी पहिली भारतीय


बॉलिवूड डेस्क : वेडिंग अॅनिवर्सरीपूर्वीच प्रियांका चोप्राला एक मोठी आनंदाची बातमी मिळाली. माराकेच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलने तिचे यश सेलिब्रेट करण्यासाठी तिला सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. तिला हे ट्रिब्यूट ऐतिहासिक स्थळ जेमा एल फना स्क्वायरमध्ये दिले जाईल. ही पहिली वेळ आहे जेव्हा एका इंडियन सेलिब्रिटीला या फेस्टिव्हलमध्ये व्यक्तिगत स्वरूपात सन्मानित केले जात आहे.
यांनाही मिळेल सन्मान...
प्रियांका व्यतिरिक्त तीन आणि लोकांनी सिनेमामध्ये त्याच्या योगदानासाठी सकानमानीत केले जाईल. यामध्ये अमेरिकन दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड, वेटरन फ्रेंच फिल्ममेकर बरट्रॅन्ड तावेर्निएर आणि तीन दशकापासून मोरक्कन सिनेमाची स्टार असलेली मूना फत्तेउदेखील सकामील आहे.


सेलिब्रेशनपूर्वी पोस्ट केले रोमँटिक फोटो...
मागच्यावर्षी एक आणि दोन डिसेंबरला प्रियांकाच्या लग्नाचे प्रोग्राम सुरु होते. तिचे दोन डिसेंबरला हिंदू रितीरिवाजाने लग्न झाले. त्यामुळे कपलदेखील अॅनिव्हर्सरी दोन तारखेला साजरी करण्याची शक्यता आहे. अशातच प्रियंकाने इंस्टाग्राम अकाउंटवर पती निकसोबत एक रोमँटिक फोटो शेअर केला होता.

Post a Comment

0 Comments