सिडनीत वणव्यामुळे दिल्लीपेक्षाही जास्त प्रदूषण; लोकांना श्वासात रोज घ्यावा लागतोय ३४ सिगारेटएवढा धूर


सिडनी - ऑस्ट्रेलियातील तर्मिल शहरातील झुडपांना आग लागली आहे. याची झळ शहरातील ४७४०० हेक्टर क्षेत्राला बसली आहे. शहरातील सुमारे ११० ठिकाणे यामुळे प्रभावित झाली आहेत.
प्रशासनाने लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना केली आहे. दुसरीकडे पर्यावरण विभागाने म्हटले आहे की, गेल्या एक महिन्यात सिडनीलगतच्या २.२० लाख हेक्टर परिसरात आग पसरली आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी खूपच वाढली आहे. सिडनीच्या दक्षिण- पश्चिम भागात स्थिती सर्वात वाईट आहे. येथे पीएम २.५ ची पातळी ६८० वर पोहोचली आहे. याचाच अर्थ येथे राहणारे लोक दिवसभरात ३४ सिगारेटचा धूर घेत आहेत. एवढी वाईट स्थिती भारतातील दिल्लीतही नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. पोर्ट मॅकक्वॅरमध्ये १९ आणि लिस्मारेमध्ये २० आणि सिगिजमध्ये १७ सिगारेटचा धूर रोज फुप्फुसात जात आहे. तज्ज्ञांचे पथक : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने देशभरातून २१ फायरफायटर तज्ज्ञांचे पथक तयार केले आहे. ते सर्व ३८ जण देशाच्या विविध भागात तैनात राहतील. या लोकांच्या ख्रिसमस तसेच इतर सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Post a Comment

0 Comments