पदासाठी दबाव टाकणे रक्तात नाही, भाजप साेडण्याच्या अफवाच : पंकजा


मुंबई : ‘गाेपीनाथगडावर १२ डिसेंबर राेजी या, मी तुमच्याशी संवाद साधणार अाहे. पुढे काेणत्या मार्गाने जायचे, काय करायचे, ते ठरवू,’ अशी साेशल मीडियावर पाेस्ट टाकणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्ष साेडणार असल्याच्या वावड्या उठल्या हाेत्या. मात्र स्वत: पंकजा यांनी दाेन दिवसांनंतर माध्यमांसमाेर येऊन ‘मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती असून पक्ष साेडण्याच्या वावड्याच अाहेत,’ असे स्पष्ट केले.अशा चर्चांमुळे मी दुखावले असून, पदांसाठी दबाव टाकणे माझ्या रक्तात नाही,’ असेही त्यांनी सांगितले.
परळीतून पराभूत झाल्यापासून बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ‘नाॅट रिचेबल’ झालेल्या पंकजा मुंडे यांनी दाेन दिवसांपूर्वी साेशल मीडियावर एक पाेस्ट टाकून १२ डिसेंबर राेजी गाेपीनाथ मुुंडेंच्या जयंतीला गाेपीनाथगडावर कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची घाेषणा केली हाेती. याच कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी ‘मावळा’ शब्द वापरला. तसेच ‘पुढे काय करायचे ते ठरवू’ असे अावाहन केल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराज असलेल्या पंकजा शिवसेनेत जाणार असल्याच्या वावड्याही उठल्या. मात्र विधान परिषदेत अामदारकी किंवा इतर माेठ्या पदांसाठी हे दबावतंत्र असल्याचा निष्कर्ष राजकीय विश्लेषकांनी काढला हाेता. पंकजांच्या या पाेस्टमुळे भाजपमधील एका गाेटात अस्वस्थता निर्माण झाली हाेती. स्वत: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही पंकजा व माझी मुलगी राेहिणी यांच्या पराभवात भाजपच्याच लाेकांचा हात असल्याचे सूताेवाच केले हाेते.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपचे नेते विनाेद तावडे, राम शिंदे व बबनराव लाेणीकर यांनी मुंबईतील ‘राॅयल स्टाेन’ या निवासस्थानी पंकजा मुंडेंची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. या बैठकीनंतर शिंदे म्हणाले, ‘१२ डिसेंबरला गाेपीनाथगडावर दरवर्षीच कार्यक्रम असताे. तिथे पंकजा कार्यकर्त्यांना एक वेगळी दिशा देत असतात. मात्र, यंदा माध्यमांनी त्यांच्या पाेस्टचा विपर्यास केला. त्यामुळे पंकजा व्यथित झाल्या. हे षड॰यंत्र कोणीतरी रचले, याबाबत पंकजा याेग्य वेळी भूमिका जाहीर करतील. संभाषणातून दुःख कमी होत असतं. म्हणूनच मी व तावडे हे पंकजांना भेटायला आलो,’ असे शिंदे म्हणाले.

Post a Comment

0 Comments