पंतवर विश्वास आहे, त्याला संधी द्यायला हवी'; विराट कोहली


स्पोर्ट डेस्क : भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीने आज(गुरुवार) यष्टीरक्षक ऋषभ पंतची पाटराखण केली. विराट म्हणाला की, "ऋषभच्या कौशल्यावर पूर्ण विश्वास आहे. पण, त्याला खेळण्याची संधी दिली जावी. ऋषभ मैदानात थोडीही चूक केली तरी, धोनी-धोनी असे ओरडणे चुकीचे आहे. तो एकदा फॉर्ममध्ये आला, तर खूप उत्कृष्ट कामगिरी करू शकतो." वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होत असलेल्या टी-20 सिरीजपूर्वी विराटने पत्रकार परिषद घेतली. पहिला सामना येत्या शुक्रवारी हैद्राबादमध्ये होणार आहे.
गोलंदाजी हा मोठा मुद्दा नाही- कोहली
"गोलंदाजी आमच्यासाठी खूप मोठा मुद्दा नाहीये. भुवनेश्वर आणि जसप्रीत बुमराह अनुभवी गोलंदाज आहेत. ते टी-20 मध्ये चांगली कामगिरी करत आहेत. दीपक चाहरदेखील संघात आहे, तोही खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्यासोबत मोहम्मद शमीने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच गोलंदाजी आमच्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा नाहीये. आम्ही विंडीजसमोर चांगले प्रदर्शन करू"

Post a Comment

0 Comments