“मोदी एका दगडात 2 पक्षी मारायचे तर पवारसाहेब 4 पक्षी मारतात”


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी एका दगडात 2 पक्षी मारायचे. शरद पवार तर 4 पक्षी मारतात, असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. सोबतच महाआघाडीच्या सरकाबाबतही त्यांनी विश्वास व्यक्त केला.
आमचं सरकार 5 वर्ष टिकेल का? असा प्रश्न विचारला जातो. महाविकास आघाडीचं सरकार 5 वर्ष टिकेल असा विश्वास शरद  पवारांनी व्यक्त केला आहे. आणि तसंच होईल. आमचं सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, असंही वडेट्टीवार म्हणाले. 
भाजपला शरद पवारांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यायचा होता तर 5 वर्षांपुर्वीच त्यांना मंत्रिमंडळात सामिल करून का घेतलं नाही? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला.
महाविकास आघाडीचं सरकार बनण्यासाठी साधारण महिनाभराचा कालावधी लागला. हा निर्णय संपूर्ण अभ्यासा अंती  झाला आहे. पक्ष निहाय खातेवाटप पक्षांचे श्रेष्ठी करतील. अधिवेशनाआधी हा विषय संपवा, अशी आमची ईच्छा आहे.

Post a Comment

0 Comments