धोनीच्या भवितव्याबद्दल BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचं मोठं विधान, म्हणाला….



मुंबई  : महेंद्रसिंह धोनीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं भविष्य आणि त्याची निवृत्ती हे विषय सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चेचा मुद्दा बनले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही याबद्दल विधान केलं आहे. धोनीबद्दल निर्णय घेण्यासाठी अजुन बराच वेळ असून, याबद्दल धोनी आणि निवड समिती सदस्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. याबाबतीत कोणताही संभ्रम नसल्याचं गांगुली म्हणाला.
“महेंद्रसिंह धोनीबद्दल सर्व समिती सदस्य एकवाक्यता आहे. धोनीसारख्या खेळाडूंबद्दल निर्णय घेताना काही गोष्टी या बंद दाराआड ठरवाव्या लागतात. याबद्दल जाहीर निर्णय घेतला जाऊ शकत नाही.” सौरव गांगुली प्रसारमाध्यमांशी बोलत होता. मध्यंतरी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आगामी आयपीएलमध्ये धोनी कसा खेळ करतो यावर भारतीय संघात त्याचं भवितव्य ठरेल असं म्हटलं होतं.
धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात निवड समितीने ऋषभ पंतला यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. मात्र ऋषभ सतत अपयशी ठरत असल्यामुळे धोनीला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी मध्यंतरीच्या काळात होत होती. त्यातच सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्यामुळे धोनीच्या निवृत्तीबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Post a Comment

0 Comments