दिल्ली-एनसीआरमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर; 5 नोव्हेंबरपर्यंत सर्वप्रकारचे बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश


वेब टीम
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या एक पॅनलने वायु प्रदूषणाची स्थिती पाहता शुक्रवारी दिल्ली-एनसीआर मध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची घोषणा केली आहे. पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण (ईपीसीएल) च्या म्हणण्यानुसार दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर अवस्थेत आहे. यामुळे सर्व प्रकारच्या बांधकाम कामांवर 9 नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. तसेच, हिवाळ्यामध्ये फटाके जाळण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, यावेळी दिल्ली गॅस चेंबर बनली आहे. ईपीसीएलचे अध्यक्ष भूरे लाला यांनी उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीच्या मुख्य सचिवांनी लिहिलेल्या पत्रात या आणीबाणीचा उल्लेख केला आहे. याआधी ईपीसीएलने आदेश जारी करत थंडीच्या दिवसांत फटाखे उडवण्यास बंदी लागू केली आहे. दिल्ली-एनसीआरच्या बर्‍याच भागात गेल्या एक आठवड्यापासून वायू प्रदूषण (वायू गुणवत्ता निर्देशांक) 500 च्यावर पोहोचला आहे, ही एक गंभीर परिस्थिती मानली जाते.
केजरीवाल यांनी लोकांना मास्क घालण्याचे केले आवाहन
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी शुक्रवारी ट्वीट केले की, "शेजारच्या राज्यांत पेंढा जाळल्यामुळे दिल्ली गॅस चेंबरमध्ये बदलली आहे. सरकारने खासगी आणि सरकाळी शाळांमध्ये 50 लाखांहून अधिक मास्कचे वाटप केले आहे. दिल्ली वासियांनी प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी याचा उपयोग करावा असे मी आवाहन करतो."
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केजरीवाल म्हणाले की, "हरियाणा आणि पंजाब सरकार शेतकऱ्यांना पेंढा जाळण्यास भाग पाडत आहे. यामुळे दिल्लीत प्रदूषण गंभीर स्थितीपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारी लोकांनी दिल्लीतील पंजाब आणि हरियाणा भवनासमोर प्रदर्शन करत आपला रोष व्यक्त केला होता."

Post a Comment

0 Comments