खुशखबर : गृहकर्जाचा हप्ता होणार कमी

वेब टीम : दिल्ली
एसबीआयने त्यांच्या गृहकर्ज धारकांसाठी आनंदाची घोषणा केली आहे. जुन्या कर्जधारकांना हा लाभ मिळणार असून आरबीआयने रेपो दरात कपात केल्याचा फायदा ग्राहकांना देण्याचा विचार बँक करत आहे.

एसबीआयच्या जुन्या ग्राहकांच्या मासिक हप्त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे.बँक जुन्या ग्राहकांना रेपो लिंक्ड लेंडिंग रेटवर कर्ज देऊ शकते.

बँकेला आशा आहे की, सरकार सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काही उपाय करत असेल तर दुसऱ्या तिमाहीमध्ये ग्राहकांची मागणी वाढेल.

देशातील मोठ्या बँकेने जुलैमध्ये रेपो लिंक्ड लेंडिंग रेटची सुरुवात केली होती. याचा फायदा केवळ नवीन ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला होता.

यातून बँकेच्या नव्या ग्राहकांना व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळत होता. यामुळे जुन्या ग्राहकांनाही व्यक्तीगत दरांमध्ये कपातीचा फायदा मिळवून देण्याचा विचार असल्याचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments