काश्मीरमध्ये आता फडकतोय फक्त तिरंगा

वेब टीम : श्रीनगर
केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करुन जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले आहे.

याआधी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असल्याने त्यांचा स्वतंत्र झेंडाही होता. जम्मू काश्मीरच्या नागरी सचिवालयावर आधी राज्याचा ध्वज व राष्ट्रीय ध्वज फडकत असे.

कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच सचिवालयावरुन राज्याचा झेंडा काढण्यात आला आहे.

सचिवालयावर सध्या फक्त भारताचा राष्ट्रध्वज फडकत आहे.

Post a Comment

0 Comments