मुख्यमंत्री माझे राजकीय गुरू, त्यांना अंगठा देण्यासही तयार : पंकजा मुंडे

वेब टीम : बीड
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘मुख्यमंत्री माझे राजकीय गुरु असून गुरुदक्षिणा म्हणून अंगठा द्यायलाही तयार आहे, असं वक्तव्य ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

‘तुमचा देवेंद्र ते नरेंद्र हा प्रवास सुखाचा व्हावा’ अशा शुभेच्छाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.

महाजानदेश यात्रेतील सभेत त्या म्हणाल्या, तुमचा गुरु कोण असा प्रश्न मला कायम विचारला जातो.

साहजिकच माझे वडील माझे गुरु असल्याचं मी सांगते. पण आज ते आपल्यात नाहीत. त्यांच्या पश्चात देवेंद्र फडणवीस माझे गुरु आहेत.

अर्जून हा द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य होता. अर्जुनापेक्षा कुणी मोठं होऊ नये यासाठी त्यांनी एकलव्याचा अंगठा मागितला होता.

गुरुसाठी अंगठा कापून देण्याची आपली परंपरा आहे. तुमच्यासाठी मी एकलव्य होऊन अंगठा द्यायला तयार आहे. पण फक्त तो अर्जुनासाठी असावा दुसऱ्यांसाठी नाही.

Post a Comment

0 Comments