आम्ही शेवट करु, पाकिस्तानची पुन्हा धमकी

वेब टीम : इस्लामाबाद
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या माहिती आणि प्रसारणा संबंधीच्या विशेष सहाय्यक फिरदौस आशिक अवान यांनी भारताला पुन्हा एकदा युद्धाचा पोकळ धमकी दिली.

भारताने आमच्यावर युद्ध लादले तर पाकिस्तान त्याचा शेवट करेल असे फिरदौस आशिक अवान यांनी म्हटले. या संदर्भात स्थानिक वृत्तपत्रांनी माहिती दिली.

काहीही झाले तरी पाकिस्तान युद्ध पुकारणार नाही.आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणार नाही. पण युद्धासारखी स्थिती निर्माण झाली तर प्रत्येक पाकिस्तानी आपल्या सैन्यासोबत लढेल असे फिरदौस आशिक अवान राज्यपाल भवनात आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

भारत सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत.

Post a Comment

0 Comments