चांद्रयान २ ने पाठवले चंद्राचे पहिले छायाचित्र


वेब टीम : दिल्ली
चांद्रयान २ ने बुधवारी चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर आज चांद्रयानाने चंद्राचे छायाचित्र पाठवले आहे.

या मोहिमेतले हे पहिलेच छायाचित्र आहे.

चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे २६५० किलोमीटर उंचीवरुन बुधवारी हे छायाचित्र काढण्यात आले.

या छायाचित्रात चंद्रावरचे ओरिएंटल व अपोलो हे खड्डे दिसत आहेत. येत्या ७ सप्टेंबरला चांद्रयान २ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

Post a Comment

0 Comments